संदीपची नाईट स्कूल’ Print

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

सेटवर गेलो, चेहऱ्याला रंग फासला, संवाद म्हटले, मेकअप उतरवला, मानधन घेतले, घरी आलो असे सगळ्याच भूमिकांबाबत होत नाही. काही भूमिका साकारता साकारता एखाद्या कलाकारचे कळत नकळत शिक्षणही करतात.
त्याला काही नवीन गोष्टीदेखील शिकवतात. संदीप कुलकर्णीबाबत तेच झाले. ‘नाईट स्कूल’ चित्रपटातील देशपांडेसरांची भूमिका करता करता रात्रशाळेचे एकूणच स्वरूप व समस्या त्याला इतक्या व अशा प्रमाणात समजल्या की त्याचे आपले विचारमंथन सुरू झाले. त्यातून तो या भूमिकेच्या आणखी जवळ जाऊन पोहोचला. निर्माता नितीन मावानी व पटकथा-संवादलेखक- दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी आपल्याला एक अतिशय चांगली संधी दिली अशीच संदीप कुलकर्णीची भावना आहे.