चिन्मयचा स्ट्रगलर Print

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

अभिनेचा चिन्मय मांडलेकर याच्या अभिनयाने सजलेला स्ट्रगलर हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चंदेरी दुनियेचे आकर्षण  सर्वानाच असते. त्यामध्ये प्रवेश करुन आपले नाव प्रसिध्द करण्यासाठी अनेक नवीन तसेच होतकरु कलाकार नेहमीच धडपडत असतात. अशा  या ‘स्ट्रगलर’ च्या वेदना काय व कशा असतात याचे दर्शन चिन्मयने विनायक या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून या चित्रपटात दाखविलेले आहे. विजय शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये चिन्मय सोबत दीपाली मांडवकर, सचिन आवटे अक्षय वाघमारे, संदेश गायकवाड आदी नवोदीत कलाकारासह प्रिया बेर्डे, संजय मोने, उदय सबनीस आदींनी काम केले आहे. या चित्रपटातील ‘आम्ही उद्याचे हिरो’ हे शिर्षकगीत कुणाल गांजावाला यांनी गायले आहे. चित्रपटात चार गाणी असून ही सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील असा विश्वास निर्माती प्रतिमा विनोद शिंदे यांनी व्यक्त केला.