‘हे मीलन सौभाग्याचे’ Print

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ‘हे मीलन सौभाग्याचे’ हा चित्रपट शुक्रवार २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुभाष गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद, रीना जाधव, प्राजक्ता केळकर आणि मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संपूर्णपणे कौटुंबिक थानकावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेत्री रीना जाधव हिने अत्यंत वेगळी भूमिका साकारलेली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती, असे या निमित्ताने बोलताना सांगून रीना म्हणाली की, मानवी भावभावनांचा असणारा अत्यर्क संबंध या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वाना पाहावयास मिळेल. प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त या चित्रपटामुळे करिअरच्या सुरुवातीलाच चांगला फायदा झाल्याचेही तिने सांगितले.