नवे छोटे चित्रपट Print

प्रश्न मात्र जुनेच मोठे
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

‘लव्ह शवते चिकन खुराना’, ‘फ्युचर जो ब्राईट है जी’, ‘१९२० रिटर्न’ व ‘अता पता लापता’ या नावाचे चित्रपट शुक्रवारी झळकला असून काही ‘खबर’ तुम्हाला आहे का? विक्रम भट्ट ‘१९२०’ या भूतपटाचा पुढचा भाग म्हणून ‘१९२० रिटर्न’ घेऊन आला. राजपाल यादवमुळे ‘अता पता लापता’ हा विनोदीपट आहे, असे आपण म्हणायचे. आपल्याच चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी तो गोंधळला हे विनोदाने झालेले नाही. ‘एव्ह शवते..’ व ‘फ्युचर शो..’ या चित्रपटात नक्की कोणाच्या भूमिका आहेत हो हेही समजून घ्यायची तुमची इच्छा नाही ना?
चित्रपटाची निर्मिती केवढी तरी वाढल्याने प्रत्येक शुक्रवारी किमान चार हिंदी (कधी त्यासह दोन मराठी) चित्रपट झळकत आहेत.
रसिकांसमोर भरपूर पर्याय असल्याचे ‘चित्र’ असले तरी तेवढेच ते गोंधळाचेही आहे. चित्रपटाच्या गर्दीतील काही चित्रपट पाहिले नाहीत तरी चालेल, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली, हे ‘लक्षण’ काही चांगले नव्हे हो.
हिंदीत एक छोटा चित्रपट निर्माण व वितरित करायला किमान तीन-चार कोटींची गरज आहे. वर्षभरात असेच छोटे व मध्यम चित्रपट अक्षरश: ढिगभर. ते चित्रपट निर्मितीच्या स्वप्नातून निर्माण होतात, तसेच उद्याचे आपणच सुपरस्टार असू, अशा आशेनेही होतात. ते पाहणारे भेटत नसल्याने त्यातून पब्लिकचा पैसा वसूल होतो काय, या प्रश्नाचे सही उत्तरच मिळत नाही.
निदान उपग्रह वाहिनी, डीव्हीडी, रिंगटोन, कॉलरटय़ून यांच्या विक्रीतून तरी निर्मात्याची गुंतवणूक वसूल होते काय? छोटय़ा चित्रपटाबाबत प्रश्न मात्र फार मोठे हो..