सहानुभूतीची फिल्मी लाट Print

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
alt

मीनाकुमारीच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात ‘पाकिजा’ची लोकप्रियता एकदम वाढली व चित्रपटाने मराठा मंदिर चित्रपटगृहात सुवर्ण महोत्सव साजरा केला.. बलराज साहनीच्या निधनाच्या सहानुभूतीचाही ‘हँसते जख्म’ला फायदा झाला. दिव्या भारतीचे अपघाती निधनदेखील चटका लावणारे ठरले व केवळ तिच्यासाठी अनेकांना ‘रंग’ पाहावासा वाटला.
अशी आणखीनही काही उदाहरणे देता येतील. समाज सिनेमाशी कसा व किती एकरूप झाला आहे, त्याचाच प्रत्यय यातून येतो. यश चोप्रांच्या निधनानेदेखील त्यांच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ला सहानुभूती नक्कीच लाभेल असे वातावरण वाढतेय. यशजींच्या ‘प्रणयाचा बादशहा’ या प्रतिमेला आणखी बळकट करणारी अशी ही प्रेमकथा  आहे. (हे शीर्षक सुचवते व गाणी दाखवतात.) यशजींच्या जाण्याने ‘जब तक है जान’कडे पाहण्याची ‘दृष्टी’ बदलली आहे, त्यामुळे हा चित्रपट आपल्यापर्यंत अधिक सहजतेने पोहोचावा...