पुन्हा ‘शाळा’च, पण ‘धडा’ वेगळा Print

शाळा’, ‘नाईट स्कूल’ यानंतर आता असाच शाळेच्या पाश्र्वभूमीवर ‘आम्ही चमकते तारे’..
माहीमच्या एका शाळेतच प्रत्यक्ष चित्रीकरण करून विषय प्रभावी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय निर्माते दीपक एस. चौधरी व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांचे. शाळेतील एका एड्सग्रस्त विद्यार्थ्यांला फक्त शाळेच्या शिपायाकडून भावनिक साथ मिळते, याभोवती हे कथानक आहे.
भरत जाधवने ही शिपायाची भूमिका साकारून, त्याने काही वेगळ्या भूमिका साकाराव्यात अशा अपेक्षेला चांगले
उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे..

तो ‘श्वास’ ते..
संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास (२००३) ते कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘मोकळा श्वास’  (२०१२) हा मराठी चित्रपटसृष्टीचा एका दशकाचा प्रवास..
या काळात, ‘श्वास’प्रमाणेच परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या दोन मराठी चित्रपटांची भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवड झाली, पण ऑस्करच्या नामांकनात पोहोचू शकले नाहीत.
मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये झळकावेत यासाठी राजकीय पक्षांनी त्याच्या काचा फोडल्या. पण मराठीसाठीच्या वेळा गैरसोयीच्या असल्याने बऱ्याचदा प्रेक्षकांअभावी खेळ रद्द होऊ लागले.
मराठी चित्रपटाची संख्या भरमसाट वाढली, एकेका शुक्रवारी तीन-चार चित्रपट झळकू लागले आणि
प्रेक्षकांचाच गोंधळ उडाला.
..दशकातील वजाबाकीची ही
एक झलक.
पिक्चर अभी बाकी है दोस्त.

फाळके पुरस्कार कोणालाही?
‘हे मीलन सौभाग्याचे’ या
  चित्रपटाला मानाचा फाळके पुरस्कार मिळाल्याचे तुम्हाला माहित्येय?
‘बातमी’ चक्क खरी आहे, पण त्यात मोठा गोंधळदेखील आहे.
पुरस्कारांच्या चौफेर सुकाळामध्ये एक संस्था. दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देते. विशेष म्हणजे, एकाच वेळी अनेकांना खूश ठेवण्याच्या ‘हिशेबा’त ते अगदी कोणताही चित्रपट व कोणतेही कलाकार यांना हा पुरस्कार देतात आणि पुरस्कार घेणारे फारशा तपशिलात गांभीर्याने न पडताच ‘मला दादासाहेब फळके पुरस्कार मिळाला हो’
असे सांगत
सुटतात..

भरतचा ‘फेकमफाक’
एखाद्याला कोणतीही गोष्ट उगाचच बोलण्याची सवय असते. फुशारक्या मारणाऱ्या अशांना ‘फेकमफाक’ म्हणून संबोधले जाते. नेमके हेच व्यक्तिमत्त्व साकारले आहे भरत जाधव याने ‘फेकमफाक’ या त्याच्या आगामी चित्रपटात. गोपी देसाई ही व्यक्तिरेखा भरतने साकारली असून नेहमी फेकमफाक करणे हाच गोपीचा धंदा असतो.
पण एकदा हीच फेकमफाक त्याच्या अंगलट कशी येते व त्यामधून घडणारे धमाल नाटय़ या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे.
भरतच्या जोडीला प्रथमच रुचिता जाधव ही नवीन अभिनेत्री असून विजू खोटे, विजय चव्हाण, संजीवनी जाधव, मंगेश देसाई यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.
दयानंद राजन दिग्दर्शित या चित्रपटामधील प्रकाश राणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना सुदेश भोसले, शान आणि साधना सरगम यांचा स्वरसाज चढला आहे. चित्रपटाच्या छायांकनाची धुरा बॉर्डर आणि एलओसी फेम कॅमेरामन करीम खत्री यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट सहकुटुंब सर्वानी पाहावा असा असल्याचा विश्वास भरत जाधव याने यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला.

अशी ही गैरहजेरी?
युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या वतीने ‘मोकळा श्वास’च्या एमपी-३ चे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले तेव्हा चित्रपटातील किती कलाकार व तंत्रज्ञ हजर होते? स्वत: दिग्दर्शिका कांचन प्रतिक्षा लोणकर, मृण्मयी देशपांडे, ऐश्वर्या तुपे, माधवी गोगटे व संगीतकार मिलिंद इंगळे एवढेच मोजके का हो हजर राहिले? सकाळी साडेदहा वाजता ही वेळ व दादरचे रवीन्द्र नाटय़मंदिर ही जागा हे दोन्ही अनेकांना गैरसोयीचे होते की काय? सगळेच कलाकार आपापल्या कामात असे गुंतलेत की अन्य काही कारण?