दिवाळीचा फिल्मी फराळ.. Print

शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२

दिवाळी फराळ, फटाके, कंदील, रोषणाई, शुभेच्छा आणि या साऱ्या दिलखुलास- दिलधडक मूडला एकदमच साजेसे म्हणजे, दिवाळीतील मनोरंजनाची जबरदस्त धमाल देणारे चित्रपट..
एन. चंद्रांचा ‘तेजाब’ १९८८ च्या दिवाळीतच झळकला, मुख्य चित्रपटगृह ड्रीमलॅण्ड.पण दिवाळीत बडे चित्रपट प्रदर्शित करायला हवेत हे रुजवले १९९५ च्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने. त्या दिवाळीतील त्याच्या स्पर्धेतील देव आनंदचा ‘गँगस्टर’ व ‘मेरा पिया घर आया’ असे माधुरीचे नृत्य ठुमके असणारा ‘याराना’ हे केव्हाच इतिहासजमा झाले. पण ‘दिलवाले दुल्हनिया..’ अगदी आजही मराठा मंदिर चित्रपटगृहात सकाळच्या खेळाला ८९० व्या आठवडय़ात सुरू आहे.
या चित्रपटाच्या यशाने एकूण सतरा दिवाळीचा आनंद लुटला..
‘राजा हिन्दुस्थानी’, ‘घातक’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मोहब्बते’, ‘मिशन कश्मीर’, ‘डॉन’, ‘ओम शांती ओम’, ‘सावरियाँ’, ‘वीर झारा’, ‘ऐतराज’, ‘ऑल द बेस्ट’, ‘रा-वन’, यासह पूर्ण रंगात नव्याने झळकलेला ‘मुगल-ए-आझम’ हे सगळे दिवाळीतील चित्रपट. ‘सन ऑफ सरदार’ व ‘जब तक है जान’ या दिवाळीची आकर्षणे.
दिवाळी म्हणजे आनंद सोहळा, तसेच दिवाळी म्हणजे ‘बोनस’चा पैसा खर्च करण्याचा झक्कास मूडदेखील. त्यालाच सुसंगत हे दिवाळीचे चित्रपट..