युवर बार्बी Print

प्रतिनिधी - शनिवार, ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलींच्या संग्रहात कितीही खेळणी असली तरी बार्बीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बार्बी या बाहुलीचे देखणेपण आजही अनेक मुलींना आकृष्ट करते. त्यामुळेच की काय आपल्या मुलीला बार्बी बनवता नाही आले तर किमान तिच्यासाठी बार्बीसारखे कपडे तरी घालता येतील याचा विचार अनेक पालक करु लागले आहेत. बार्बी या बाहुलीने लहानांसह मोठय़ांना प्रत्येकाला वेड लावलेले आहे. बार्बीचा सेट घरी असणे म्हणजे मुलींच्या दृष्टीने स्टेटस सिम्बॉल.. पण या बार्बीच्या सेटबरोबर बार्बीला घालण्याचे विविध ड्रेसेस आता बाजारात मिळु लागले आहेत. केवळ इतकेच नाही तर हे ड्रेसेस आता तुमच्या चिमुरडीसाठी पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चिमुरडीला या बार्बीच्या ड्रेसमध्ये पाहणे केव्हाही तुम्हाला नक्कीच आवडेल. खास याला अनुसरुन बार्बीला तुम्ही जसे सजवाल तसे सजवण्यासाठी आता तैय्यार राहा. बार्बीला ज्या अ‍ॅक्सेसरी उपलब्ध आहेत त्या सर्व आता तुमच्या चिमुरडीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. बार्बीसारखे लेग्गिंज, शॉटस्, हेअरबेंड, मिनी, मीडीज्, साडी अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. केवळ इतकेच नाही तर बार्बीचे दागिनेही आता बाजारात उपलब्ध झाले आहेत. खास बार्बीच्या डॉलरुमचा केकही आता बाजारात मिळु लागला आहे. बार्बीच्या मैत्रिणी आणि बार्बी घराचा लूक अशी थीम पार्टी मुलांच्या वाढदिवसाला अरेंज होऊ लागली आहे. एकूणच काय तर बार्बी आता आपल्या अगदी दारात अवतरली आहे. केवळ ड्रेसच नाही तर बार्बीचा आभास निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आता आपल्याला अगदी आपसुक मिळणार आहेत.