सेलिब्रेटिंग मान्सून.. Print

शनिवार, १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पाऊस सुरू झाल्यावर किमान एकदा तरी पावसात मनसोक्त भिजावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण पाऊस पहिला असो किंवा श्रावणातील, पावसात भिजताना त्वचेची काळजी मात्र योग्यप्रकारे घ्यायला हवी. त्यासंदर्भातील काही टिप्स..
पावसाळ्यामध्ये शुष्क त्वचेवर डी-हायड्रेटिंगचा परिणाम आणि तेलकट त्वचेवर ओव्हर-हायड्रेटिंगचा परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. तुमची त्वचा सामान्य कोरडी असेल, तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉईश्चरायजर किंवा रीच लोशनचा वापर केला पाहिजे. एन्स प्रोन किंवा तेलकट त्वचेसाठी हलके लोशन वापरताना हेवी मॉईश्चरायजर्सचा वापर टाळायला हवा. त्वचा खूपच शुष्क वाटत असेल, तर हायऑल्युरॉनिक अ‍ॅसिड बेस्ड स्कीन
सिरमचा मॉईश्चरायजरसोबत वापर करून त्वचा मुलायम आणि ओली ठेवता येईल.
पावसाळ्यात हवेमध्ये आद्र्रतेचे प्रमाण खूप जास्त असते आणि अशा स्थितीत तुमची त्वचा आतून आणि बाहेरून ओली ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. यावेळी मॉईश्चरायजर्सचा वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. क्लिन्जर्सचा उपयोग करताना, साबण नसलेले क्लिन्जर्स निवडा आणि आठवडय़ातून दोन वेळा हे स्क्रब्स उपयोगात आणा.
पाऊस पडत असेल, तरीही चेहऱ्यावर तुम्ही सनस्क्रीन लावायलाच हवे. बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास हे तुमच्या चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचते अशा स्थितीत फ्लोटर्सचा वापर अधिक चांगला ठरतो. बुटांचा वापर टाळलेलाच बरा कारण अधिक काळ पाणी साठत असल्याने पाय भिजलेले राहतात.
पावसाळ्यात ओल्या हवेमुळे फंगल इन्फेक्शन अनेकांना होते. उष्ण आद्र्रता असलेल्या जागी, म्हणजे तुमच्या पायाचे अंगठे, काखा किंवा जांघांमध्ये फंगसची पदास आणि वाढ आरामात होत असते. अँटी फंगल साबणाने आंघोळ करणे आणि आंघोळीनंतर अँटी फंगल पावडर वापरणे, हा फंगल इन्फेक्शन रोखण्याचा एक उपाय आहे. अधिक काळासाठी आपली त्वचा ओली ठेवणे टाळा आणि तुम्ही पावसातून आला असाल, तर कोमट पाण्याने आंघोळ करा.
आता सध्या ढगाळ वातावरण असते आणि त्यामुळे सूर्यप्रकाश तितकासा नाही, याचा अर्थ तुम्ही सनस्क्रीनचा उपयोग थांबवला पाहिजे किंवा उन्हामुळे होणाऱ्या त्रासाची काळजी सोडून द्यावी असा अजिबात नाही.
दिवस अंधारे आहेत आणि त्यामुळे तितका उजेड नाही, हे खरे पण लक्षात ठेवा की ढगांमुळे केवळ २० टक्के रेडिएशन अडते. त्यामुळे आताही तुम्ही सूर्याच्या धोकादायक किरणांना सामोरे जातच असता आणि यामुळे त्वचेवर एजिंग, लाईन्स, िरकल्स आणि सेजिंगसारखे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
उन्हाळ्यात वापरता त्यापेक्षा कमी एसपीएफ क्षमता असलेल्या प्रसाधनांचा वापर तुम्ही करू शकता. एसपीएफ २४ ते ३० हे पावसाळ्यासाठी आदर्श आहे. वॉटरप्रूफ सनस्क्रीनचा वापर करा. कारण त्यामुळे तुम्ही पावसात भिजलात तरी सनस्क्रीन कायम राहील. दर ४ ते ५ तासांनी सनस्क्रीन वापरले पाहिजे.
गुलाबपाणी किंवा थर्मल वॉटरसारखे त्वचेवर फवारता येण्याजोगे स्कीन फ्रेशनर्स वापरा. यामुळे त्वचा ओली राहून डीहायड्रेशन होणार नाही. वातानुकूलित ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर आहे.
मान्सून मेकअप..
कुठलाही ऋतू असो, मेकअप करणे हे अनेकदा गरजेचे असते. मुंबई, पुणे येथील बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये लाइट मेकअप करुन येणं हे महिला कर्मचाऱ्यांसाठी कम्प्लसरी केलेलं आहे. खासकरून पावसाळ्यात मेकअप काय आणि कसा करावा हा प्रश्न पडतो. पावसात भिजल्यावर मेकअप राहात नाही. अशावेळी मेकअप करताना काही छोटय़ा टिप्स वापरल्या तर मान्सून सीझनमध्ये मेकअप करणे खूप सोप्पं होईल.

* पावसाळ्यात शक्यतो फाऊंडेशनचा वापर टाळावा. अशावेळी पावडरचा वापर करणे केव्हाही हितावह असते. फाऊंडेशनचा वापर करायचा झाल्यास वॉटर बेस्ड फाऊंडेशनचा वापर करावा.   

* पॉवर आयश्ॉडो वापरणे या सीझनमध्ये अधिक उत्तम असल्याने या आयश्ॉडो वापराव्या. तसेच यामध्ये ब्राऊन, पिंक, लवेंडर, ब्लू हे रंग या सीझनला अधिक सूट होतील.

* आयलाइनर, मस्करा आणि काजल हे वापरताना वॉटरप्रूफ असतील याची दक्षता घ्यावी.

* मॅट लिपस्टिकचा वापर या सीझनमध्ये करावा.

हेअरस्टायलिंग टिप्स इन मान्सुन
* पावसाच्या पाण्याने केस भिजले असतील तर ते लगेच सुक्या कपडय़ाने पुसुन कोरडे करावेत.

* पावसाळ्यात टाइट पोनी टेल ही हेअर स्टाइल अतिशय सोयीस्कर असते. यामुळे केस भिजण्याची शक्यता नसते.