कॅलिग्राफी ते मिकी Print

शनिवार, २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्याकडे आर्टिस्टच्या डोक्यातुन एखादी कल्पना अवतरली की त्या कल्पनेला लगेच उचलुन धरलं जातं. मध्यंतरी कॅलिग्राफी केलेले टी शर्ट अंगावर घालणं हे एक स्टाइल स्टेटमेंट होतं. पण कॅलिग्राफी केवळ टी शर्टपर्यंत मर्यादीत राहिली नाही तर, ही कॅलिग्राफी कुर्त्यांवरही अवतरली. खास आपल्याला हव्या त्या पद्धतीने कॅलिग्राफी करवुन घेणाऱ्यांची संख्या वाढली. यामध्ये देवी देवतांचे फोटो, काही ठराविक ओळी, काही ठराविक शब्दं, वाक्ये अशा अनेक कॅलिग्राफी आपल्याला दिसत होत्या. आता मात्र टी शर्टवर आपल्याला आवडेल अशी कॅरेक्टर्स दिसु लागली आहेत. यामध्ये प्राणी, पक्षी, पाने, फुले अशा विविध गोष्टी दिसतात. केवळ एवढेच alt
नाही तर यामध्ये आता खास देशाशी संबंधित अनेक गोष्टी दिसतात. ताजमहालची प्रतिकृती, एखादे देवस्थान अशा अनेक विविधरंगी गोष्टी आता दिसु लागल्या आहेत. खास टी शर्टला साजेसे कापड विकत आणुन त्यापासुन टी शर्ट टेलरकडुन शिवायचे आणि नंतर त्यावर हव्या त्या चित्राचे प्रिंट काढुन घ्यायचे हे उद्योग अनेकजण करत असत. पण आता मात्र याकरता अधिक कटकट नको म्हणुन दुकानदारच इतक्या व्हरायटीने हजर झालेली आहेत की आपल्याला पाहतानाही नेमकं काय घ्यावं हा प्रश्न पडतो.
टी शर्ट हा तरूणांचा आवडता पेहराव. त्यामुळे त्यामध्ये व्हरायटी आणणे हे साहाजिक आहे. खास टी शर्टवर बिइंग ह्य़ुमन लिहुन सलमान खानने त्याच्या एनजीओला एका वेगळ्या लेव्हलवर स्थान दिलं. आज तेच बिइंग ह्य़ुमनचे टी शर्ट चक्क १५० रुपयांमध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. केवळ बिइंग ह्य़ुमनच नाही तर माय गणेशा, माय भीम अशी देवांची छायाचित्रांनाही प्रचंड मागणी आहे. साहित्यातील काही वाक्ये, मराठीतील कविता, म्हणी, टाइमपास मेसेजेस, बोली भाषेतील आपली वाटणारी वाक्ये म्हणजे अगदी सोप्पं उदाहरण घ्यायचं झाल्यास चल काय तरीच काय असंही लिहीलं जातं. सोव्हिनिअर असलेल्या अनेक गोष्टींना टी शर्टवर स्थान मिळालेलं आहे. काही टी शर्ट प्रसंगानुरुपही असतात. सण आल्यावर टी शर्टचे रुप बदलते. आषाढी यायच्या आधी वारीचे चित्र असणारे टी शर्ट बाजारात पाहायला मिळाले. थिस इज माय कार्टुन म्हणुन पर्सनलाइज्ड कार्टुन असलेली टी शर्टही बाजारात आलेली आहेत. खास काही ठिकाणीच ही पाहायला मिळतील. याकरता काही खास आर्टिस्ट काम करतात. याची किंमत अंदाजे ५०० रुपये आहे.  
सध्या कॉलेजगोईंग मुलांमध्ये लोकप्रिय झालेला आहे तो आपला मिकी.. मिकी आणि मिनी ही पात्रे लहानांसह मोठय़ांना प्रत्येकाला आवडतील अशीच आहेत. मिकी केवळ टी शर्टवर अवतरलेला नाही. तर तो आपल्याला शर्टच्या बटणांमध्येही पाहायला मिळेल. या बटणांचे आकारही बदलु लागले आहेत. खास या बटणांमुळे या शर्टची किंमतही वाढते. वाढती किंमत असली तरी मिकीच्या आवडीला मात्र पर्याय नाही. पुर्वी घरातल्या टीव्हीवर ठराविक काळात येणारा मिकी अंगाखांद्यावर अवतरला तर कुणाला आवडणार नाही. सध्या मिकीची क्रेझ ही फार मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे. केवळ मुलांच्या नाही तर मुलींसाठीही मिकीचे टीशर्टस् तयार होऊ लागले आहे. मिकीचे जॅकेट आणि मिकीच्या बॅग्ज आपल्याला पाहायला मिळतील. या बॅग्जच्या किंमती २५० रुपयांपासुन ते २५०० हजारांपर्यंत आहेत. यामुळे मिकीचा भाव आता भलताच वधारलेला आहे.
बेबी शिल्पा या फॅशन डिझाइनरने मिकीला तर चक्क रॅम्पवॉकवर उतरवला. यामुळे तो तर अवघ्या फॅशन इंडस्ट्रीच्या कौतुकाचा भाग बनलेला आहे. त्यामुळे मिकीवर आधारीत अनेक गोष्टी बाजारात अवतरु लागल्या आहेत. पुर्वी केवळ मिकीची बॅग आपल्याला पाहायला मिळायची आता, मिकीची वॉटर बॉटल, डबा अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.