बॅण्ड विथ द बेस्ट फ्रेंण्डस् ... Print

शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. फ्रेंडशिप डे जवळ आला की, कॉलेजच्या आजूबाजुच्या वातावरणाचेही रंग बदलतात. जवळपासच्या दुकानांमध्ये फ्रेंडशिप डेचे बॅण्ड दिसू लागतात. उद्या ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. एव्हाना कॉलेजकॅम्पसमधल्या मुलांनी नवीन आलेल्या कुठल्या मुलीशी फ्रेंडशिप करायची हे ठरवलंच असेल की नाही.. असो मैत्रीला तसाही कुठला दिवस असा नसतोच. वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपल्या मैत्रीचा इजहार करू शकतो. त्यामुळे केवळ हाच रविवार आहे आणि त्यानंतर मग काय? तर असा विचारही डोक्यात आणू नका. पण एकमात्र न विसरता करा. बाजारात रपेट मारा आणि नवीन बॅण्डमध्ये कुठले प्रकार आलेत याकडे लक्ष द्या. बाजारात नानाविध फ्रेंडशिप बॅण्डस् उपलब्ध झाले आहेत.
पुर्वी केवळ सॅटिन्सच्या रिबीन्स आपलं लक्ष वेधून घेत होत्या. पण आता मात्र फ्रेंडशिप डेच्या दिवशी हातात घातलेले बॅण्ड वर्षभर फॅशन म्हणूनही हातात घातले जातात. सध्या या बॅण्डमध्ये फ्रेंडशिप ब्रेसलेटची खूप चलती आहे. विविध कलर्समध्ये आणि altआकारांमध्ये उपलब्ध असलेली ही ब्रेसलेट्स अनेकांना आकर्षून घेत आहेत. यामध्ये विविध रंगातील धाग्यांनी ओवलेली ब्रेसलेट तर आहेतच. पण आता बिड्सची ब्रेसलेटस्ही उपलब्ध आहेत. काही बॅण्ड तर नुसते धाग्यांपासून तयार करण्यात आलेले आहेत. याला घुंगरू किंवा तुमच्या नावाचे अक्षर पाहायला मिळेल. तसेच कलाकुसर केलेले विविध नवीन पर्याय बाजारात आहेत. यात लोकरीच्या धाग्यांपासूनही तयार केलेले बॅण्डस् आहेत. काही बॅण्डस् तर पाहताक्षणी घ्यावेसे वाटतात. मुलांसाठी असलेल्या बॅण्डस्मध्ये डिझाइन्स आणि कलर्स वेगळे आहेत हे पाहताक्षणी लक्षात येईल.
बांगडय़ांच्या आकारांमध्येही फ्रेंडशिप बॅण्ड उपलब्ध आहेत. बांगडीवर कलाकुसर करून हे बॅण्ड बनवण्यात आलेले आहेत. altयामध्ये दोन रंगाचे धागे एकत्र करून डिझाइन्स तयार केलेल्या पाहायला मिळतील. तुम्हाला यावर काही अक्षरं किंवा कुणाला द्यायचंय त्या व्यक्तीचं नाव तुम्ही सांगितलं तर त्याप्रमाणेही बॅण्ड बनवून मिळतील. केवळ एका रंगातील बांगडय़ांचे बॅण्डस्ही उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हवा तो रंगही मिळेल. पिवळा, लाल, गुलाबी या धाग्यांनी बांगडय़ा सजवलेल्या पाहायला मिळतील. त्यातील तुम्हाला हव्या असलेल्या बांगडय़ा निवडू शकता. मण्यांचे बॅण्डस् आणि त्याचबरोबर रुद्राक्ष बॅण्डस्ही आता तरूणांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. यामध्ये खास मुलांसाठी रुद्राक्ष बॅण्डस् उपलब्ध आहेत. बॅण्ड बांधण्यासाठी असलेला धाग्यामध्येही विविध व्हरायटी आहेत. यामध्ये लटकन, घुंगरू पाहायला मिळतील.  खास तुमच्यासाठी काही फ्रेंडशिप डे चे एसएमएस आम्ही देत आहोत.