फ्लॉवर पॉवर Print

३१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

केसात फूल माळणं म्हणजे आऊट ऑफ फॅशन झालेलं आहे. पण असं असलं तरी केसांमधील स्टाइलसाठी आजही फुलांचा वापर हा सर्रास केला जातो. ही फुलं प्लॅस्टिकची असोत अथवा ट्रान्सपरंट कपडय़ाची असो. केसात माळण्यासाठी फुलांचा उपयोग आजही केला जातोय फक्त थोडय़ा वेगळ्या पद्धतींनी. खास फुलांचे हेअरबॅंडस् सध्या इन फॅशन आहेत. यामध्ये विविध फुलांच्या डिझाइन्सचे हेअरबॅंडस् आपले लक्ष वेधून घेतात.केवळ इतकंच नाही तर या हेअरबॅंडस्मध्ये असलेलं वैविध्य आपल्याला आकर्षुण घेतं.जास्वंदीच्या फुलाचा हेअरबॅंड सध्या खूप इन आहे.हेअरबॅंडवर केवळ एकच फुल प्लॅस्टिकचं असतं पण हे फुल मात्र मोठ्ठं असतं हा असा हेअरबॅंड कॉलेजगोईंग मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे.मोकळे केस ठेवून हा हेअरबॅंड लावला की मस्तच लूक येतो.आता केसात केवळ हेअरबॅंड नाही तर केसाला लावणाऱ्या रबरवरही फुलं दिसु लागली आहेत.वेगवेगळ्या रंगातील रबर्स आणि फुलं पाहताना कुठला रबर घेऊ असं होतं.शिवाय हे रबर्स प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग असतील तर फुलं घालण्याची हौसही भागते.केसांचे क्लिप्समध्ये सुद्धा आता फुलांचा वापर सर्रास करण्यात आला आहे.लहान मुलींच्या क्लिप्समध्येही फुलांचा वापर फार उत्तम रितीने करण्यात आलेला आहे.प्रेस क्लिप्स या लहाना मुलींसाठी अतिशय उत्तम म्हणून बऱ्याच लहान मुलींच्या केसांमध्ये आपल्याला प्रेस क्लिप्स दिसतात.यावर आता विविध रंगाची फुलं चिकटवलेली असतात.केवळ इतकेच नाही तर आता फुलांची जागा चप्पल्स बॅग आणि हातातील ब्रेसलेटवर सुद्धा दिसून येईल.