शॉप इट.. Print

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

शॉपिंग हा तरूणांचा जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं जातं. परंतु असं अजिबात नाही. ‘शॉपिंग’हा अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंतचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पण अलीकडे शॉपिंगची व्याख्या मात्र बदलत चाललीय. ‘मॉल शॉपिंग’ हा शॉपिंग संस्कृतीच्या प्रगतीचा पहिला टप्पा. अद्ययावत शॉपिंगचा पुढील टप्पा म्हणजे-‘ऑनलाईन शॉपिंग’!!
परदेशामध्ये ‘ऑनलाईन शॉपिंग’ हा अगदी सरावाचा भाग झाला आहे. भारतामध्ये सुद्धा ‘ऑनलाईन शॉपिंग’ करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घरबसल्या शॉपिंग करण्याचा हा मार्ग अत्यंत सोपा आणि सुकर आहे. घरपोच सेवेशिवाय वेळेची बचत, पैशांची बचत, घरी बसून आपल्याला हवी ती गोष्ट शोधून मिळवण्याचा सर्वात उत्तम उपाय. ऑनलाईन शॉपिंगसाठी बऱ्याच वेबसाइट उपलब्ध आहेत.

alt
तरूण मुलं विशेषत: सीडी, पुस्तकांची खरेदी करण्यासाठी या मार्गाचा अधिक वापर करतात.  भारतीय वस्तूंची ऑनलाईन ग्राहकपेठ म्हणजेच ‘शोपो.इन’(www.shopo.in) ही वेबसाईट अस्तित्वात आली आहे. अवघ्या काही दिवसांतच भारतीयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग’ची ही वेबसाईट अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
दागिने, भित्तीचित्रे, डायरी, शुभेच्छापत्रे, फोटो फ्रेम, खेळ, घड्याळ, बॅग्स्, पुस्तकं, कॉम्प्युटर आणि पर्सनल अ‍ॅक्सेसरीज, किचन अ‍ॅक्सेसरीज अशा साधारण ५० प्रकारच्या विविध वस्तू या वेबसाईटद्वारे आपण खरेदी करू शकतो. या सर्व वस्तू alt
भारतीय कलाकुसरीपासून बनविण्यात आल्या आहेत. तसेच अनेकविध ‘इको-फ्रेण्डली’ वस्तू या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या वेबसाईटचे सदस्यत्व निशुल्क आहे. तसेच ३ ते५ दिवसांच्या आत आपण ऑर्डर केलेली वस्तू घरपोच पोहचते.
भारतातील विविध ठिकाणच्या कारागिरांनी बनविलेल्या अस्सल,एथनिक वस्तूं घरबसल्या आपण पाहू शकतो व खरेदी करू शकतो.त्याचप्रमाणे ह्या वेबसाईटवर आपण भारतीय कलाकुसरीच्या वस्तूंची विक्रीदेखील करू शकतो. अशाप्रकारे ‘शोपो.इन’ (www.shopo.in) च्या अनेकविध विशेष फिचर्समुळे ही वेबसाइट खरोखरच यशस्वी ठरत आहे. भारतीय ग्राहकांसाठी आणि भारतीय वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी निर्माण करण्यात आलेली ही अद्ययावत ग्राहकपेठच आहे!! ‘ऑनलाईन शॉपिंग’च्या जगतात भारताचं विशेष स्थान निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला हा एक स्तुत्य प्रयत्न आहे, असं म्हणायला हरकत नाही.   
www.jabong.com ही वेबसाईट अलिकडे तरूणांमध्ये फार लोकप्रिय आहे. या वेबसाईटवर असणाऱ्या वस्तूंवर क्लिक केल्यावर या वस्तू घरी येतात. यामध्ये शूज, फर्निचर, पर्सेस, शर्टस् अशा विविध वस्तू आपल्याला पाहायला मिळतील. घरबसल्या आपल्याला हव्या त्या वस्तूवर क्लिक करून तिची डिलीव्हरी आपल्याला किमान पाच दिवसात घरी मिळेल असा दावाही या कंपनीने केला आहे. सध्या तरूणाईच्या दृष्टीने हा वेबकट्टा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. मुख्य म्हणजे या वेबकट्टय़ावरील शॉपिंगही रिझनेबल आहे.
www.fashionandyou.com ही वेबसाईटही तितकीच उत्तम आहे. सध्या या साईटच्या माध्यमातून खास फेस्टिव्ह सीझन डोळ्यासमोर ठेवून साडय़ा आणि एथनिक वेअर आणलेलं आहे. यावर काही टक्के सूटही देण्यात येत आहे. शिवाय सेलचा पर्यायही आपल्याला उपलब्ध आहे. लग्नाकार्यासाठी असलेले कपडेही या साईटवर उपलब्ध आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतसाठी वेळ देता येत नाही. मग शॉपिंग करण्यासाठी वेळ काय आणि कसा देणार असा प्रश्न पडलेल्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग हा बेस्ट पर्याय आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.