ट्रेक डायरी Print

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
कास पुष्प पठारास भेट
साताऱ्याजवळील कासचे पुष्प पठार म्हणजे महाराष्ट्राचे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’! या पावसाळी हंगामामध्ये इथे अनेक प्रजातींची लक्षावधी फुले उमलतात. विविध रंग-नक्षीच्या या फुलांच्या पठारास भेट देण्यासाठी १५ आणि १६ सप्टेंबर रोजी ‘निसर्ग दर्शन’तर्फे अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात कास पठाराशिवाय सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
रिव्हर राफ्टिंग
‘जंगल कब’तर्फे येत्या २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान ‘रिव्हर राफ्टिंग’ आणि जंगल निवास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२४४९९९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.