ट्रेक डायरी Print

दुर्गदर्शन छायाचित्रण स्पर्धा
शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज, रायगड समितीतर्फे  ‘शिवशाहीचे साक्षीदार-दुर्गदर्शन छायाचित्रण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि मानचिन्ह, तृतीय पारितोषिक २ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज ई-मेलद्वारे ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहिती ६६६. www. shivrajabhishek.com या संकेतस्थळावर मिळू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८७०५९९९४०, ९००४००४४४४  या क्रमांकावर संपर्क साधावा.

कर्नाटक-गोव्यातील जंगल भ्रमंती
पुण्यातील ‘झेप’ संस्थेतर्फे येत्या दिवाळीच्या सुटीत कर्नाटक-गोव्यातील जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी देवेश अंभ्यकर (८०८७४४८२९७, ०२०-२४३७३९२४) या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘कात्रज ते सिंहगड’ भ्रमंती
जिवाशी ट्रेकर्सतर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त चांदण्या रात्री ‘कात्रज ते सिंहगड’ या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या मोहिमेत कात्रजचे जंगल पायदळी तुडवून स्िंाहगडाच्या माथ्यावर मुक्काम करण्याचा थरार अनुभवता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ज्ञानेश्वर अजबे (९०४९८६०१८४, ९८२२००४३८४), विजय भाकरे (९९७०३४४६६५)

रायरेश्वर सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त रायरेश्वर, कारी, आंबवडे अशा भ्रमंतीचे आयोजन केले आहे. रायरेश्वर पठारावरील शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, तर कारी येथे स्वराज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या कान्होजी जेधे यांची समाधी आहे. आंबेगाव येथील झुलता पूल, नागेश्वर मंदिर आदी स्थळे या सहलीत दाखवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.