ट्रेक डायरी Print

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
ताडोबा सफर
alt

चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे. अशा या ताडोबाच्या सफारीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने येत्या २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
कोकण दर्शन
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ३ नोव्हेंबर रोजी कोकण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत वेळास येथील कासव संवर्धन, बाणकोट, फत्तेगड, गोवा, कणकदुर्ग किल्ला, आंजर्ले येथील गणपती मंदिर, हर्णे बंदर आणि सुवर्णदुर्ग आदी ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
नागझिरा-नवेगाव सफर
जंगल कब संस्थेतर्फे २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागझिरा-नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्पांमध्ये जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२४४९९९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जंगल सफारीचे आयोजन
‘पगमार्क्स’तर्फे गीर, पेंच आणि दांडेली जंगल सफरींचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-३०५२३४७९ क्रमांकावर संपर्क साधावा.