महागाई नियंत्रणात आणण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार -अ‍ॅड. देशपांडे Print

विशेष प्रतिनिधी
अन्नधान्य, डाळींचे व्यवहार वायदेबाजारातून केले जात असल्याने महागाईला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी केले असून महागाई रोखण्यासाठी पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अन्नधान्य, डाळी, साखर, खाद्यतेले यांचा पुरवठा पुरेसा होत असताना दुष्काळाच्या नावाखाली कृत्रिम दरवाढ केली जात आहे. व्यापाऱ्यांची व दलालांची अवाजवी नफेखोरी सुरू आहे. त्यातच विक्रीचे व्यवहार वायदेबाजारातून होत असल्याने समभाग व रोख्यांप्रमाणे उगाचच दर फुगविले जात आहेत.
 मागणी व पुरवठा तत्त्वावर हे दर निश्चित झाले पाहिजेत. भरमसाट नफा कमावणाऱ्यांवर नियंत्रण आणले गेले पाहिजे, असे मत अ‍ॅड. देशपांडे यांनी व्यक्त केले.