आज गिरगावात ‘मेरे साजन है उस पार’ Print

प्रतिनिधी
संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आशा फॅन्स असोसिएशनने रविवार, ४ नोव्हेंबर रोजी गिरगावात ‘मेरे साजन है उस पार’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकणे आणि पाहणे याबरोबरच त्यांच्याविषयी अन्य गायक-गायिका, संगीतकार, दिग्दर्शक आदींनी सांगितलेल्या आठवणीही या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला व पाहायला मिळतील. हा कार्यक्रम आर्यन हायस्कूल हॉल, तळमजला, गिरगाव चर्चजवळ,गिरगाव येथे रविवार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी शैलेश देशपांडे (९००४६५१५८४) अथवा शैलेश ओळकर (९६१९१००२७४) यांच्याशी संपर्क साधावा.