‘मी - आयुष्याच्या पलीकडे’ चित्रपटाचा मुहूर्त Print

प्रतिनिधी

कोहिनूर सिने व्हीजन या नव्याने स्थापन झालेल्या बॅनरखाली ‘मी-आयुष्याच्या पलीकडे’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच पुण्यात करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील श्रीधर एस. पारिगी यांचे कथा-पटकथा-दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताला ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ उपस्थित होत्या. ज्योती चांदेकर, लोकेश गुप्ते, अथर्व कर्वे, सुनील गोडबोले, मृण्मयी देशपांडे, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीकांत पुराणिक, सिद्धार्थ चांदेकर, सतीश केंजले, प्रसन्ना केतकर आदी कलावंत या चित्रपटात असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
निर्माता शशांक जोशी असून प्रवीण भिसे व देवेंद्र परांजपे सहनिर्माते म्हणून काम पाहणार आहेत. अथर्व कर्वे हा बालकलाकार चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शक श्रीधर पारिगी यांचा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी यापूर्वी त्यांनी मराठीत एक माहितीपट केला आहे. मराठी चित्रपटांचा दर्जा उच्च व्हावा या उद्देशाने निर्माता शशांक जोशी यांनी मराठी चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले आहे.