जानेवारीत रंगणार ‘एक लक्ष’वेधी एकांकिका स्पर्धा Print

प्रतिनिधी
विलेपाल्र्यातील सोहम प्रतिष्ठान आणि मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघातर्फे ‘एक लक्ष’वेधी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात होणाऱ्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या एकांकिकेला तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  
व्यावसायिक नाटय़संस्था आणि नाटक-चित्रपट-मालिका यामध्ये कार्यरत असणारे तंत्रज्ञ, कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट-मालिकांत व्यग्र असताना त्यातून थोडा वेळ रंगभूमीसाठी काढून कलाकारांनी आपल्या कलागुणांना नवा उजाळा द्यावा, या हेतूने ही स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती ‘सोहम’चे विनीत गोरे यांनी दिली. या स्पर्धेची प्राथमिक फेरी सात, आठ व नऊ जानेवारी या दिवशी होणार असून १३ जानेवारीला अंतिम फेरी घेण्यात येईल. या स्पर्धेचे अर्ज नऊ डिसेंबपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. संपर्क- चंद्रकांत मेहेंदळे- ९३२३४८७०२५, सुहास सावरकर- ९९६९०३५५०३, दीपक अष्टीवकर- ९९६७४५९१८९