नैसर्गिक कोलाज पेंटिंग Print

altअर्चना जोशी, रविवार २९ एप्रिल २०१२
साहित्य - नैसर्गिक वाळलेला कचरा जसे- बाभळीच्या शेंगा, कणसाची सालं, वाळलेली गोलाकार पानं, फेव्हिकॉल, कात्री, अ‍ॅक्रॅलिक रंग, कार्डपेपर, ब्रश, पॅलेट, बाऊल इ.
कृती - आपल्याला हव्या त्या रंगाच्या उभ्या आकाराच्या कार्डपेपरवर बाभळीच्या शेंगा काही उलटय़ा, काही सुलटय़ा चिकटवून घ्या. खालच्या बाजूस गवताचा भाग दाखविण्यासाठी कणसाची सालं उभट व लांबट आकारात कापून चिकटवा. वाळलेली गोलाकार पानं फुलांसारखी शेंगांच्या वर मध्यावर चिकटवा. हे सर्व पूर्णपणे वाळल्यावर अ‍ॅक्रॅलिक ग्लिटर्सच्या गुलाबी रंगानं फुलांचा मधला भाग थोडासा उठावदार बनवा. गवत ठसठशीत दिसेल असं हिरव्या रंगाने रंगवा, की झालं तुमचं नैसर्गिक कोलाज पेंटिंग तयार!