डोकॅलिटी Print

altज्योत्स्ना सुतवणी, रविवार २९ एप्रिल २०१२
बालमित्रांनो, येत्या आठवडय़ात आपण एकाच दिवशी दोन महत्त्वाचे दिवस साजरे करणार आहोत. तुम्ही बरोबर ओळखलंत!  आपण १ मे रोजी  जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत. आज आपण प्रश्नरूपाने महाराष्ट्राची थोडी ओळख करून घेऊ या. १)    मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून --- यांनी शपथ घेतली.
अ) वसंतदादा पाटील     ब) शंकरराव चव्हाण
क) यशवंतराव चव्हाण

२)     क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील --- राज्य आहे.
अ) दुसरे     ब) पहिले     क) तिसरे

३)     आचार्य अत्रे यांनी आपल्या --- या वृत्तपत्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोरदार पुरस्कार केला.
अ) तरुण भारत     ब) केसरी     क) मराठा

४)     महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर म्हणजे --- .
अ) कळसूबाई     ब) महाबळेश्वर     
क) सप्तशृंगी
५)     कविवर्य राजा बढे आणि संगीतकार श्रीनिवास खळे या जोडीचे खालीलपकी कोणते गीत गाजले?
अ) जय जय महाराष्ट्र माझा    
ब) प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा  
क) मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा

६)     ब्रिटिश सरकारला ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जाब विचारणारे महाराष्ट्रातील तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणजे ---.
अ) म. गांधी     ब) आगरकर     
क) लोकमान्य टिळक

७)     ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने अवघ्या मरगळलेल्या महाराष्ट्राला जागवून --- या संतांनी शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेस हातभार लावला.
अ) संत तुकाराम     ब) संत एकनाथ     
क) संत रामदास

८)     चंद्रपूर जिल्ह्यात कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी आनंदवनाची स्थापना --- यांनी केली.
अ) मदर तेरेसा     
ब) शिवाजीराव पटवर्धन
क) बाबा आमटे

९)     महाराष्ट्र राज्यात --- जिल्हे आहेत.
अ) ३५     ब) ३४     क) २९
१०)     महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने --- या नावाची विशेष गाडी सुरू केली आहे.
अ) गरीब रथ     
ब) डेक्कन ओडिसी
क) पॅलेस ऑन व्हील्स


११)     जवाहरलाल नेहरूंचे नाव महाराष्ट्रातील खालीलपकी --- या बंदराला दिले गेले आहे.
अ) जैतापूर     ब) मुंबई     क) न्हावा-शेवा

१२)     २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई व पुणे यांच्या खालोखाल महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर --- हे आहे.
अ) ठाणे     ब) नागपूर     क) नाशिक

१३)     --- हा जिल्हा ज्वारीचे कोठार समजला जातो.
अ) सोलापूर     ब) कोल्हापूर     क) नागपूर

१४)     नाशिक जिल्ह्यातील येवला हे ठिकाण --- यासाठी प्रसिद्ध आहे.
अ) कांजीवरम     ब) पठणी     क) बांधणी साडी

१५)     महाराष्ट्रात वाहणाऱ्या नद्यांपकी सर्वात जास्त लांबीची नदी --- ही आहे.
अ) कृष्णा     ब) कोयना     क) गोदावरी