झटपट अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग Print

altअर्चना जोशी , रविवार , ६ मे २०१२
साहित्य- रंगीत कार्डपेपर, पोस्टर रंग, ब्रश, स्ट्रॉ, खराब झालेला टूथब्रश, कापड, कागद, बाऊल, पॅलेट.
कृती- आपल्याला हव्या त्या आकाराचा रंगीत कार्डपेपर कापून घ्या. पॅलेटमध्ये थोडा गडद रंग घ्या व त्यात पाणी घालून तो थोडा पातळ करा.  या रंगात थोडा खराब झालेला टूथब्रश बुडवून त्याने रंगीत कार्डपेपरवर रंगांचे शिंतोडे मारा. काही मोठय़ा थेंबांना स्ट्रॉने फुंकर मारून वेडेवाकडे पसरू द्या. तुम्ही वापरलेल्या रंगाच्या विरूद्ध रंगाने मोठे थेंब पाडून हाताच्या बोटाने गोलाकार चकत्या बनवा. उरलेलया भागामध्ये कागदाच्या किंवा कापडाच्या बोळ्याचे ठसे द्या की झाले तुमचे अ‍ॅब्स्ट्र्क्ट पेंटिंग तयार!