गंमत Print

altमुक्ता केणेकर , रविवार , १३ मे २०१२
तांबडी जास्वंद गणपतीला वाहिली
नारिंगी संत्री चाखून पाहिली
पिवळ्या शेवंतीची वेणी केली
हिरव्या रानी कोकिळा गायली

निळ्या आकाशात पक्ष्यांचे थवे
देवशच्या कळसात घुमतात पारवे
फांदी-फांदीवर जांभळे पिकली
इंद्रधनुष्याची गंमत हसली