बुकमार्क Print

altअर्चना जोशी , रविवार , २७ मे २०१२
साहित्य- आईस्क्रीमची काडी, पुठ्ठा, अ‍ॅक्रिलिक रंग, ब्रश, कात्री, पेन्सिल, गम इत्यादी.
कृती- आईस्क्रीम खाल्ल्यावर त्याच्या काडय़ा टाकून न देता त्या जमवा. त्या काडय़ांमधून तुम्ही  स्वत: छानसं बुकमार्क तयार करू शकता. आईस्क्रीमच्या एका काडीला पुढून-मागून अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवा व पूर्णपणे वाळू द्या. या वाळलेल्या रंगीत काडीवर रंगविलेल्या रंगाच्या विरूद्ध रंगात पेन्सिलने चित्र काढा, ते रंगवा व वाळवा. पुठ्ठय़ाचा छोटासा चौकोन कापून तो रंगवा. पूर्णपणे वाळल्यावर त्यावर कोणतेही सोपे चित्र काढा. हे चित्र दोन्ही बाजूने काढू शकता. पुठ्ठय़ाचा चौकोन आईस्क्रीमच्या काडीला गमच्या साहाय्याने चिकटवा. पतंगाच्या आकारात चिकटवल्यास थोडा वेळ लागतो. तुम्ही तयार केलेला हा छोटासा बुकमार्क तुमच्या पुस्तकात ठेवण्यासाठी वापरा.