डिझायनर पेपरबॅग Print

altअर्चना जोशी , रविवार , ३ जून २०१२
साहित्य : हँडमेड पेपर, रंगीत कागदाच्या पट्टय़ा, कात्री, गोंद, सॅटिन रिबीन, बटण इत्यादी
कृती : हँडमेड पेपरच्या मागील बाजूस पेन्सिलने दिलेली आकृती काढून घ्या. बाहेरच्या बाजूने कात्रीने कापून घ्या. मधोमध दुमडून घ्या. उजवी व डावी बाजू मधोमध

चिकटवा. खालील बाजू दुमडून बंद करा. वरच्या बाजूने थोडेसे दुमडून मध्यावर पंचने छिद्र पाडून घ्या. सॅटिनच्या रिबीनने हँडल बनवून ते बांधा. तयार बॅगेच्या डाव्या बाजूस  फूल लावून विरुद्ध रंगाच्या पट्टय़ा सारख्या आकारात कापून घ्या. या पट्टय़ा गोलाकार बाहेरून आत अशा चिकटवनू फूल बनवा. मध्यावर एखादे बटन चिकटवा. हे फूल चिकटवून वरील बाजूस वेगवेगळ्या रंगांच्या पट्टीला एकदा आत व एकदा बाहेर असे गुंडाळून ‘२’ आकार बनवा व चिकटवा. तशाच प्रमाणे खालील बाजूसही चिकटवा. झाली तुमची डिझायनर बॅग तयार.