देखावा Print

संपदा साळवी ,रविवार ,१० जून २०१२

साहित्य : एक आडवा रिकामा खोका (टुथपेस्ट/ अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा)  घ्या. पिवळा कागद, हिरव्या छटांचे कागद, हिरव्या रंगाचे स्केचपेन, पेन्सिल, कातर, गोंद.
कृती : प्रथम पूर्ण खोक्याला बाहेरून एक कागद चिकटवून घ्या. वेगवेगळ्या कागदांवर प्राणी, झाडं, झुडपं यांची चित्रे काढून ती रंगवून घ्या.
ही चित्रे कापण्यापूर्वी खालून अर्धा इंच पट्टी दुमडण्यापुरती ठेवा. खोक्याच्या वरील बाजूस वेगवेगळ्या अंतरावरती ही कापलेली चित्रे  चिकटवून घ्या. अंतर वेगवेगळे ठेवल्यामुळे चित्रांमध्ये एक खोली (डेप्थ) निर्माण होईल.  शेजारील चित्र हे जंगलातील देखावा असल्याने त्यात जंगलातील प्राणी दाखवले आहेत. अशा वेगवेगळ्या देखाव्यांचा पपेट शो बॅकग्राऊंडसाठी वापरता येतो.