कागदी विमान Print

अर्चना जोशी ,रविवार १५ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

साहित्य : जुने वर्तमानपत्र, सहा आइस्क्रीमच्या काडय़ा, अ‍ॅक्रॅलिक रंग, ब्रश, टुथपेस्टचे झाकण (बूच), गम इ.
कृती : वर्तमानपत्राचे दुहेरी पान घ्या व त्याची लांबलचक गुंडाळी करा (कागदी पट्टी). ती घट्टपणे चिकटवून घ्या. एकीकडून साधारण सहा इंचावर एकावर एक तीन वेळा दुमडून चिकटवा. तयार झालेल्या आयताकृती भागात चार काडय़ा एकासमोर एक पंखाप्रमाणे अडकवून चिकटवा. त्रिकोण व आयताच्या मधील जागेत दोन काडय़ा जवळजवळ चिकटवा. पूर्ण विमान चिकटवून झाल्यावर वाळू द्या. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अ‍ॅक्रॅलिक रंगात रंगवा जेणेकरून ते व्यवस्थित चिकटेल व चकचकीत दिसेल. ते पूर्णपणे वाळल्यावर बुचाच्या निमुळत्या भागाच्या वर गोल चिकटवा. वाळल्यावर समोरील बाजूस ते बूच अडकवा किंवा चिकटवा. अशाच प्रकारे तुम्ही हेलिकॉप्टरही बनवू शकता.