प्रश्नमंजूषा- टेनिस Print

रविवार १५ जुलै २०१२

नुकतीच विम्बल्डन स्पर्धा पार पडली. शिवाय याच महिन्यात सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही टेनिसच्या पदकांची लूट कोण करतो याबद्दल आपल्याला उत्सुकता आहेच. आजच्या प्रश्नमंजूषेत आपण आपले टेनिसचे ज्ञान पारखून घेणार आहोत.
१) खालीलपकी कोणता खेळाडू भारताकडून खेळत नाही?
अ)महेश भूपती ब)रोहन बोपन्ना क)इसाम कुरेशी ड)सोमदेव देवबर्मन
२) टेनिस हा खेळ खालीलपकी कोणत्या पद्धतीने खेळला जात नाही?
अ)महिला एकेरी ब)पुरुष दुहेरी क)मिश्र दुहेरी ड)मिश्र एकेरी
३) सामान्यत: ग्रँड स्लॅम पुरुष एकेरी स्पध्रेत खेळाडूला सामना जिंकण्यासाठी किती सेट जिंकणे आवश्यक असते?
अ)दोन ब)तीन  क)पाच
४) सामान्यत: ग्रँड स्लॅम महिला एकेरी स्पध्रेत खेळाडूला सामना जिंकण्यासाठी किती सेट जिंकणे आवश्यक असते?
अ)दोन ब)तीन  क)पाच
५) ग्रँड स्लॅममध्ये महिला / पुरुष एकेरी स्पध्रेतील सामने अनुक्रमे एकूण किती सेटचे असतात?
अ)महिला ३ / पुरुष ५ ब)महिला २ / पुरुष ४ क )महिला ३ / पुरुष ४
६) या खेळात एक सेट कमीत कमी किती गेम्सचा खेळला जातो?
अ)पाच ब)सहा क)सात
७) या खेळात खेळाडूला एक सेट जिंकण्यासाठी प्रतिस्पध्र्यापेक्षा कमीत कमी किती गेम जास्त जिंकणे आवश्यक असते?
अ)एक ब)दोन    क)तीन
८) या खेळात जर दोन्ही खेळाडूंचे एका सेटमध्ये ६-६ असे गेम झाले असतील तर तो सेट जिंकण्यासाठी ‘‘-----’’ या पध्दतीचा वापर होतो?
अ)टाय ब्रेकर ब)सेट ब्रेकर क)पेनल्टी शूट
९) एका गेममध्ये जेव्हा दोन्ही खेळाडूंचे गुण ४०-४० असतात तेव्हा त्याला
‘‘-----’’ असे संबोधतात.
अ)डय़ूस ब)इक्वल क)टाय
१०) एका गेममध्ये जर दोन्ही खेळाडूंचे ४०-४० गुण असल्यास पुढचा गुण जो खेळाडू जिंकतो त्याला ‘‘-----’’ मिळतो.
अ)अ‍ॅडव्हांटेज ब)अ‍ॅडव्हान्स लेव्हल क)नेक्स्ट लेव्हल
११) टेनिसमध्ये १५-० किंवा ०-१५ हे गुण सांगताना ‘शून्य’ ला काय म्हणतात?
अ)झिरो ब)लव्ह क)नॉट
१२) टेनिसमध्ये सारखे गुण उदा. १५-१५ हे गुण ‘‘-----’’ असे सांगितले जातात.
अ)१५ऑल ब)इक्वल १५ क)१५बोथ
१३) टेनिसमध्ये बिनतोड सíव्हसला काय म्हणतात?
अ)एस (ace) ब)फोर हँड क)टॉप स्पिन ड)ट्रम्प
१४) विम्बल्डन येथील टेनिस कोर्ट खालीलपकी कोणत्या प्रकारचे आहे?
अ)लाल माती(क्ले) ब)गवत(ग्रास) क)हार्ड कोर्ट ड)यापकी कोणतेही नाही
१५)२०१२ साली नदालने सातव्यांदा फ्रेंच ओपन एकेरी स्पर्धा जिंकून कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला?
अ)पीट सॅम्प्रस ब)जिमी कॉनर्स क)ब्योन बोर्ग ड)जॉन मॅकनरो
१६)सध्या पुरुष एकेरी सर्वाधिक ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे कोणाच्या नावावर आहेत?
अ)रॉजर फेडरर ब)पीट सॅम्प्रस क)बियॉन बोर्ग ड)स्टीफन एडबर्ग
१७)१९८८ साली महिला गोल्डन ग्रँडस्लॅम जिंकणारी एकमेव महिला टेनिसपटू कोण?
अ)मार्टनि नवरातिलोव्हा ब)स्टेफी ग्राफ क)सेरेना विल्यम्स ड)मार्गारेट कोर्ट
१८)सर्वाधिक जागतिक अजिंक्यपदे - एकेरी व दुहेरी मिळून (टायटल्स) जिंकणारी महिला टेनिसपटू कोण?
अ)मार्टिना नवरातिलोव्हा ब)स्टेफी ग्राफ क)सेरेना विल्यम्स ड)मार्गारेट कोर्ट
उत्तरे :
१) क) इसाम कुरेशी
२) ड) मिश्र एकेरी
३) ब) तीन
४) अ) दोन
५) अ) महिला ३ / पुरुष ५
६) ब) सहा
७) ब) दोन
८) अ) टाय ब्रेकर
९) अ) डय़ूस
१०) अ) अ‍ॅडव्हांटेज
११) ब) लव्ह
१२) अ) १५ऑल
१३) अ) एस (ace)
१४) ब) गवत (ग्रास )
१५) क) बियॉन बोर्ग
१६) अ) रॉजर फेडरर
१७) ब) स्टेफी ग्राफ
१८) अ) मार्टनिा नवरातिलोव्हा