डोकॅलिटी Print

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार , २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बालमित्रांनो, ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे सातत्याने सांगितले जाते. भारतीय संस्कृतीत झाडांना पवित्र मानले गेले आहे. झाडांचे उपयोग तर तुम्हाला माहीतच आहेत. पूजेच्या तयारीत विडा-सुपारी, चंदन यांसारख्या अनेक गोष्टी लागतात. त्याही झाडांपासूनच मिळतात. सोबत तुम्हाला काही झाडांची नावे दिली आहेत. आणि त्यांची वैशिष्टय़े दिली आहेत. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत.
१) याला भृंगराज असेही म्हणतात.
२) या गणपतीला प्रिय असतात.
३) शंकराच्या पिंडीवर याची पाने    वाहतात.
४) ही वनस्पती कृष्णाला प्रिय आहे. याच्या फुलांना मंजिऱ्या म्हणतात.
५) ही पत्री मंगळागौरीच्या पूजेत विशेषकरून वापरली जाते.
६) याच्या पानांची माळ मारुतीला प्रिय असते.
७) याच्या पानाला अश्वत्थपत्र असेही म्हटले जाते.
८) दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन या वृक्षाचे दर्शन घेतात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे या झाडावरील एका ढोलीत ठेवली होती.
९) तलवारीसारखी लांब पाने असणारी ही सुगंधी वनस्पती आहे.
१०) गुढीपाडव्याच्या सणामध्ये या अमृतवृक्षाला अनन्यसाधारण स्थान आहे.
११) हिंदू लोक ‘दसऱ्याचे सोने’ म्हणून याची पाने वाटतात.
१२) कोणत्याही शुभप्रसंगी याच्या पानांचे तोरण दाराला हवेच.
१३) या झाडापाशी दत्तगुरूंचे वास्तव्य असते, असे हिंदुधर्मीय मानतात.
१४) सत्यवान-सावित्रीची कथा या झाडाशी निगडित आहे.
१५) लग्न-मुंज, सत्यनारायण अशा शुभकार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर याची पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते.
झाडांची नावे : आंबा, आपटा, आघाडा, औदुंबर, केवडा, कडूनिंब, केळ, माका, बेल, दुर्वा, तुळस, पिंपळ, रुई, वड, शमी.
उत्तरे :
१) माका, २) दुर्वा, ३) बेल, ४) तुळस, ५) आघाडा, ६) रुई, ७)  पिंपळ, ८) शमी, ९) केवडा, १०) कडूनिंब, ११) आपटा, १२) आंबा, १३) औदुंबर, १४) वड, १५) केळ.