वर्षां मारुती भिसे - २६ ऑगस्ट २०१२
झाडावर भरली एकदा चिमण्यांची शाळा फांद्यांची लेखणी होती आकाशाचा फळा! चिमणाराजा मास्तर होते शिकवत छान मुलांना
दाण्यांचा खाऊसुद्धा वाटला त्यांनी पिल्लांना! चिवचिवच्या तालावर सारे होते गात पाढेसुद्धा म्हटले त्यांनी एकसाथ सुरात! हिरव्या हिरव्या पानांचे धडे त्यांनी वाचले खूश होऊन झाड तेव्हा वाऱ्यासंगे नाचले! अभ्यासाचा नाही केला त्यांनी मुळी कंटाळा झाडावर भरली एकदा चिमण्यांची शाळा! |