रविवार,२ सप्टेंबर २०१२
चिव चिव करीत चिमणी आली बाहुलीचा घास घेऊन गेली बाहुलीचा माझ्या भलता राग रडता रडता पाही आकाशात चिऊताई बाई किती लबाड
बाहुलीच्या माझ्या वेडावते फार देव बाप्पा देव बाप्पा इतके करा चिमणीचा खोपा झाडावर टांगा रघुनाथ मोहिते
पावसात जाऊ की नको?
पावसात नाचेन गारा वेचेन सांग ना आई, मी जाऊ की नको? पावसात जाशील भिजून येशील नको बाई नको, पावसात नको. पावसाची धार वाटे गारगार सांग ना आई, मी जाऊ की नको? सर्दी होईल तापही येईल नको बाई नको, पावसात नको. नाचतो मोर नाचे मनमोर सांग ना आई, मी जाऊ की नको? पटकन जा चटकन ये म्हणू कसं बाळा, तुला मी नको. ऊर्मिला बांदिवडेकर |