कागदी आपटय़ाच्या पानांच्या शुभेच्छा Print

अर्चना जोशी ,रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
alt

साहित्य: गडद व फिक्कट हिरवा (पोपटी) कार्डपेपर, सोनेरी रंग, हिरवा (मेंदी) पोस्टर कलर, ब्रश, कात्री, गम, स्केचपेन इ.
कृती: गडद हिरव्या कार्डपेपरला आयताकृती दुमडून त्यावर आपटय़ाचे अध्रेपान अर्धगोलात काढा व कापून घ्या. फिक्कट हिरव्या रंगात छोटी-छोटी ३/४ पाने काढा व कापून घ्या. पोस्टर कलर्सने मेंदी रंगात शिरांचे चित्र (हलक्या हाताने) काढून रंगवा. पुढील बाजूस पेन्सिलने सरस्वतीचे चित्र काढा व सोनेरी रंगात रंगवा व छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे एक छोटेसे फिक्कट हिरवे पान चिकटवा. आतील बाजूस उरलेली २ पाने चिकटवा. एक मध्यम आकाराचे फिक्कट हिरवे पान आतील दर्शनी (उजव्या) भागावर चिकटवा. त्यावर स्केचपेनने शुभेच्छा लिहा. हे करताना सुबक अक्षर व सुंदर रंगसंगतीचे भान ठेवा. अशा पद्धतीने आपटय़ाची पाने न ओरबाडता दसऱ्याच्या शुभेच्छा द्या व पर्यावरणप्रेमी व्हा.