डो ’ कॅ ’ लि ’ टी Print

ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
alt

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’.  दसरा म्हणजेच विजयादशमी. भारतवर्षांतील हा साडेतीन मुहूर्तापकी एक पूर्ण मुहूर्त. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्राची समाप्ती या दिवशी होते. चांगल्या पाऊसपाण्याने आलेल्या समृद्धीमुळे सर्वत्र आनंदी वातावरण असते. नवीन उपक्रमांच्या शुभारंभासाठी हा दिवस निवडला जातो. अशा या शुभ दिवसाच्या निमित्ताने पाळल्या जाणाऱ्या परंपरांमागची वैचारिक भूमिका काय आहे, हे आज आपण या कोडय़ाद्वारे बघणार आहोत. ‘अ’ गटात नवरात्र-दसऱ्याच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या परंपरा दिलेल्या आहेत. तर ‘ब’ गटात त्या परंपरांमागच्या भूमिका दिल्या आहेत. तुम्हाला त्यांच्या योग्य त्या जोडय़ा लावायच्या आहेत.
‘अ’ गट
१) रावण दहन
२) शस्त्र पूजन
३) पाटी पूजन
४) सीमोल्लंघन
५) सोने लुटणे
६) नवरात्र - दुर्गा पूजा
७) नवरात्र - गरबा
८) नवरात्र - भोंडला
‘ब’ गट
* सुजलाम् सुफलाम् सृष्टीचा आनंद राधा-कृष्णांच्या रासलीलेच्या आठवणींनी घेणे.
* हस्त नक्षत्रातील पावसाला निरोप.
* आदिशक्तीच्या महालक्ष्मी, काली, भवानी इत्यादी विविध रूपांची पूजा करून स्मरण करण्याचा सोहळा.
* वर्षभर आपल्या सोबत राबणाऱ्या साधने-आयुधांबद्दल कृतज्ञता.
* समृद्धी वाढवण्यासाठी नवीन मोहिमांचा शुभारंभ.
* आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळालेल्या संपत्तीचे दान.
* नवीन ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याचा शुभारंभ.
* दुष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय.
alt

उत्तरे :
१) रावण दहन- दुष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय.
२) शस्त्र पूजन- वर्षभर आपल्या सोबत राबणाऱ्या साधने-आयुधांबद्दल कृतज्ञता.
३) पाटी पूजन- नवीन ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याचा शुभारंभ.
४) सीमोल्लंघन- समृद्धी वाढवण्यासाठी नवीन मोहिमांचा शुभारंभ.
५) सोने लुटणे- आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळालेल्या संपत्तीचे दान.
६) नवरात्र- दुर्गा पूजा- आदिशक्तीच्या महालक्ष्मी, काली, भवानी इत्यादी विविध रूपांची पूजा करून स्मरण करण्याचा सोहळा.
७) नवरात्र- गरबा- सुजलाम् सुफलाम् सृष्टीचा आनंद राधा-कृष्णांच्या रासलीलेच्या आठवणींनी घेणे.
८) नवरात्र- भोंडला- हस्त नक्षत्रातील पावसाला निरोप.