‘हीरो’चा घाटा ‘बजाज’च्या पथ्यावर Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
देशातील पहिल्या क्रमांकाची आणि कट्टर स्पर्धक असलेल्या हीरो मोटोकॉर्पच्या यंदाच्या घसरत्या वाहनविक्रीचा लाभ बजाज ऑटोला झाला आहे. सर्वाधिक विक्री होणारा ब्रॅण्ड म्हणून विकसित होताना कंपनीच्या डिस्कव्हरने गेल्या महिन्यात हीरोच्या स्प्लेन्डरवर मात केली आहे. बजाजच्या डिस्कव्हरने यंदाच्या सप्टेंबरमध्ये १,२२,९६८ बाइक्सची विक्री नोंदविली. तर हीरोच्या ‘स्प्लेन्डर’ सप्टेंबरमध्ये १,२१,०१८ विकल्या गेल्या. ‘डिस्कव्हर’ जागतिक स्पर्धेतही क्रमांक एकचे उत्पादन ठरली असल्याचा दावा बजाज ऑटोच्या मोटरसायकल विभागाचे अध्यक्ष के. श्रीनिवास यांनी बुधवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला. आठवडय़ापूर्वी  दुचाकींच्या किंमती वाढविणाऱ्या बजाज ऑटोतर्फे जानेवारी २०१३ मध्ये १०० सीसी बाइक बाजारात येत आहे.
‘स्प्लेन्डर’वर ‘डिस्कव्हर’ची मात