लघू व मध्यम उद्योजकांसाठी मुंबईत राष्ट्रीय परिषद Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’तर्फे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त लघु व मध्यम उद्योजकांसाठी ‘इंडिया एसएमई लिडरशीप’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकूल येथील हॉटेल ट्रायडेन्ट येथे ५ ऑक्टोबर रोजी ही राष्ट्रीय परिषद होईल. ‘एमसीएक्स’चे जिग्नेश शहा हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेसंबंधी अधिक माहितीसाठी दूरध्वी क्रमांक ०२२-६१५०९८०० संपर्क साधण्याचे आवाहन चेंबरचे सरचिटणीस एस. महेशकुमार यांनी केले आहे.