अर्थवृद्धीबाबत ‘एडीबी’चा अंदाजही खालावला Print

नवी दिल्ली , पीटीआय

विशेषत: विलंबाने झालेला पाऊस आणि त्याचे कृषी उत्पादनावरील विपरीत परिणाम पाहता, एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी)चाही भारताच्या आर्थिक वृद्धीदराबाबत अंदाज खालावला आहे. पूर्वी अंदाजलेल्या ७ टक्क्यांऐवजी मार्च २०१३ अखेर देशाला ५.६ टक्क्यांनीच आर्थिक विकास साधता येईल, असे एडीबीने ताज्या अहवालात स्पष्ट केले आहे. तथापि, नव्याने दिसून आलेली आर्थिक सुधारणांची कास आणि त्या संबंधाने धोरणाचा धडाका कायम राहिल्यास, गुंतवणूकविषयक चित्र झपाटय़ाने बदलू शकते आणि प्रत्यक्षात घसरत्या विकासाचा क्रम उलटविला जाऊ शकते, असेही एडीबीने संपूर्ण आशियाई क्षेत्राच्या आर्थिक विकासाबाबत दृष्टीक्षेपात स्पष्ट केले आहे. चीनवरील जागतिक मंदीच्या सावटापायी एकूण आशिया खंडाचा आर्थिक विकासदरही ‘एडीबी’ने पूर्वअनुमानित ७.२ टक्क्यांवरून, ६.१ टक्क्यांवर सुधारून घेतला आहे.