इंडियन ऑईलला उत्कृष्टतेचा पुरस्कार Print

तेल व वायू पुरवठा साखळीतील आघाडीची कंपनी म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’चा गौरव करण्यात आला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या सहाव्या एक्स्प्रेस, लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन पुरस्कार सोहळ्यात कंपनीच्या विपणन विभागाचे संचालक एम. नेने यांनी कार्यकारी संचालक (पुरवठा) एस. बालसुब्रमण्यम यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला.