जॉन्स लॅन्ग लासेले किरकोळ मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात Print

बांधकाम क्षेत्रातील आघाडीची सेवा पुरवठार जॉन्स लॅन्ग लासेलेच्या भारतीय व्यवसायाने आता किरकोळ मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातही शिरकाव केला आहे. यासाठी कंपनीने एव्हरस्टोन कंपनीबरोबर सहकार्य केले असून या अंतर्गत महाराष्ट्रातील पुण्यासह गुजरातमधील दोन शहरांमध्ये चार मॉलचे व्यवस्पापन केले जाणार आहे. यामध्ये कोचीतील एका मॉलचाही समावेश आहे. यासाठी जॉन्स लासेले १९.१ लाख चौरस फूट जागेचे मालमत्ता व्यवस्थापन करेल. याबाबतच्या सहकार्यावर जॉन्स लॅन्ग लासेलेच्या भारतीय व्यवसायाचे प्रमुख अनुज पुरी व एव्हरस्टोन कॅपिटल अ‍ॅडव्हाजर्सचे भागीदार व मुख्य कार्यकारी अधिकारी धनपाल झवेरी यांनी सहमती दर्शविली.