बडोदा स्कूल ऑफ बँकिंगचा पहिला दीक्षान्त सोहळा Print

राष्ट्रीयीकृत बँक ऑफ बडोदाने मणिपाल एज्युकेशनच्या सहयोगाने ऑगस्ट २०११ मध्ये सुरू केलेल्या बडोदा मणिपाल स्कूल ऑफ बँकिंगमधून अलीकडेच पदविकाधारक १६९ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडली. बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. डी. मल्ल्या यांनी दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थ्यांना पदविका बहाल केल्या. या सर्व विद्यार्थ्यांना बँकेच्या सेवेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून ताबडतोबीने सामावून घेण्यात आले आहे.