‘टॅबकॅब’कडून टॅक्सीचालकाला किमान वेतनाची हमी Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
आधुनिक फोन फ्लीट कॅब सेवांमधील नवीनतम भर असलेल्या ‘टॅबकॅब’ने आपल्या चालकांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करताना दरमहा ते किमान १२,००० रुपये कमावू शकतील, याची हमी देणारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे ‘टॅबकॅब’चे साथी (चालकाला) प्रतिदिन द्यावे लागणारे भाडे आणि इंधन मूल्य वजा जाता प्रतिमहिना १२,००० रुपये कमावता आले नाहीत, तर या उर्वरित रकमेची भरपाई टॅबकॅबकडून केली जाईल. टॅबकॅबचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पुरोहित यांनी सांगितले की, टॅक्सीचालक हीच आमची खरीखुरी संपत्ती आहे आणि म्हणून त्यांना ‘साथी’ असे आम्ही संबोधितो. या योजनेमुळे प्रतिमहिना १२,००० रुपये निश्चित मिळणार असल्याने जगण्यासाठी लागणाऱ्या वाढत्या खर्चाशी जुळवून घेणे साथींना शक्य होणार आहे.