श.. शेअर बाजाराचा : ‘स्टॉप लॉस’च नव्हे ‘स्टॉप प्रॉफिट’ही महत्त्वाचे! Print

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘स्टॉप लॉस’ म्हणजे काय? याप्रमाणे ‘स्टॉप प्रॉफिट’ पण लावता येतो का हा प्रश्न गजानन पाटील यांचा आहे. (वस्तुत: सध्या तेजीवर स्वार बाजाराची एकमार्गी वाटचाल सुरू असताना, हा प्रश्न व त्याप्रमाणे वर्तन अत्यंत कळीची बाब ठरते.) एखादा शेअर तुम्ही समजा १०० रुपयांना विकत घेतला आणि आठ दिवसांनी त्याचा भाव ९० झाला. परत काही दिवसानी तो ८५ झाला. आता तुम्ही ८५ ला विकणार तेव्हा १५ रुपये प्रति शेअर तोटा होणार हे उघड आहे. मग तुम्हाला असे वाटते की ९० असताना विकला असता तर बरे झाले असते म्हणजे मग तोटा १० रुपयांपर्यंत सीमीत राहिला असता. अर्थात असे होण्यासाठी तुम्हाला निरंतर लक्ष ठेवून रहावे लागते जे शक्य होतेच असे नाही. म्हणून मग शेअर्स जेव्हा खरेदी केला होतात तेव्हाच ब्रोकरला सांगावे की, जेव्हा केव्हा हा शेअर ९० वर आला तर विकून टाक. यालाच ९० चा स्टॉप लॉस लावला असे म्हटले जाते. याच प्रमाणे ११० भाव झाला तर विकून टाक असेही सांगता येते. आपण जे स्टॉप प्रॉफिट म्हणता ते हेच! सांप्रत संगणकीकरणामुळे हे सर्व सहज शक्य होत असते.
सुधीर दामले यानी खूप वर्षांपूर्वी त्यांच्याकडील शेअर सर्टििफकेट्स ब्रोकरमार्फत विकली. पण संबंधित खरेदीदार व्यक्तीने ती स्वतच्या नावावर हस्तांतरित केली नसावीत असे दिसते. कारण गेली काही वष्रे त्यांना कंपनीकडून लाभांशाचे धनादेश येत असतात. त्यांनी ते बँकेत जमा केले नाहीत कारण नतिकदृष्टय़ा त्यांना ते गर वाटते. सात वर्षांपेक्षा जास्त काळ लाभांशाचा धनादेश जर बँकेत जमा केला गेला नाही, पर्यायाने तो लाभांश कुणी घेतलाच नाही तर ती रक्कम गुंतवणूकदार संरक्षण निधीत जमा होते. कंपनीच्या दफ्तरी अजूनही दामले यांचेच नाव आहे व ते तसेच राहणार हे उघड आहे.  यातून मार्ग कसा काढायचा हा त्यांचा रास्त प्रश्न आहे. प्रथमत: कंपनीच्या फळअ ला पत्र लिहून ही सर्व हकीगत कळवावी आणि डुप्लिकेट शेअर सर्टििफकेट मिळण्याची प्रक्रिया सुरू करावी. सुमारे दोन महिन्यात हे काम पूर्ण होऊन नवीन सर्टििफकेट त्यांना मिळेल. त्यानंतर दरवर्षी येणारे लाभांशाचे चेक त्यांनी आपल्या खात्यात जमा करावेत व त्याचा वेगळा हिशेब ठेवावा. याचे कारण पुढेमागे मूळ खरेदीदार जागृत झाला तर आपल्या सद्हेतूबाबत कुणी शंका घ्यायला नको. त्यावेळी सदर लाभांशाची रक्कम तसेच शेअर सर्टिफिकेट त्या खरेदीदार व्यक्तीला देऊन टाकावे. महत्वाचे म्हणजे ही सर्व वस्तुस्थिती कंपनीला कळवली असल्याने तुमची बाजू पारदर्शक राहील. या उपरही खरेदीदार व्यक्ती पुढे येत नसेल तर तुमचा इलाज नाही.
अमित नळे यांचा प्रश्न असा की त्यांचे वडील शारिरीक व्याधीमुळे सही करू शकत नाहीत, तर मग यापुढे शेअरचे खरेदी विक्री व्यवहार कसे करायचे? डिमॅट खाते कसे ऑपरेट करायचे? ब्रोकर म्हणतो की कोर्टाकडून ऑर्डर घ्यावी लागेल वगरे. खरे तर यातून सोपा मार्ग आहे. वडील भले सही करू शकत नाहीत पण ते मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांनी मुलाच्या नावाने मुखत्यारपत्र द्यावे (ढ६ी१ ऋ अ३३१ल्ल८) म्हणजे मग डिमॅट खाते मुलगा ऑपरेट करू शकेल. अर्थात मुखत्यार-पत्रावर ते आंगठा लावतील जो नोटरीकडून प्रमाणित करून घ्यायचा. तसेच डीपीसमक्ष अंगठा लावायचा. सोबत डॉक्टरचे सर्टििफकेट जोडावे म्हणजे संदिग्धता राहात नाही. आता राहिला प्रश्न ब्रोकरला सूचना द्यायचा. इथे सही कशाला लागणार आहे? ईमेलद्वारे तुम्ही ब्रोकरला सूचना देऊ शकता किंवा फोनवरून पण ब्रोकर सूचना घेतो व त्याप्रमाणे व्यवहार करतो.
राजापूरहून अनिल हर्डीकर यांनी कार्यशाळा फक्त शहरी भागातच होतात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकाना वंचित रहावे लागते अशी तक्रार केली आहे. रविवार, १४ ऑक्टोबर रोजी पूर्ण दिवसाची विनामूल्य कार्यशाळा लँडमार्क हॉटेल, रत्नागिरी येथे बँक ऑफ इंडियाने आयोजित केली आहे जी मी संबोधित करणार आहे. चांगल्या कामासाठी अनेक संस्था पुढे येतात याचे हे उदाहरण. २० ऑक्टोबरला दादर इथे होणाऱ्या कार्यशाळेच्या सर्व शंभर जागा भरल्या आहेत त्यामुळे कुणी नाव नोंदणीसाठी फोन वा ईमेल करू नये.