तेजीचा बैल उधळला १९,००० वरतेजीचा बैल उधळला १९,००० वर Print

 

सुधारणांचा सपाटा; तेजीला बळ
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

आर्थिक सुधारणांच्या ताज्या पर्वावर मोहीत होत भारतीय भांडवली बाजाराने १७ महिन्यांपूर्वीच्या सर्वोच्च स्थानाला गुरुवारी गवसणी घातली. तेजीवाल्यांची मजबूत पकड बसलेल्या बाजारात ‘सेन्सेक्स’ने १९,००० तर ‘निफ्टी’ने ५,८०० या महत्त्वाच्या टप्प्यांना गाठले. मुंबई निर्देशांकातील ही सलग चार सत्रातील जवळपास ५०० अंशांची वाढ असून, त्यापायी गुंतवणूकदारांची मायाही ४८,००० कोटी रुपयांनी वधारली आहे. गेल्या सलग तीन सत्रात जवळपास ३०० अंशांची भर घालणारा मुंबई शेअर बाजार गुरुवारी सकाळी तर १७५ हून अधिक अंशांच्या वाढीसह खुला  झाला. सेन्सेक्सने प्रारंभीच १९,०५० अंशांवर सूर मारला.

१५ जुलै २०११ नंतर ‘सेन्सेक्स’ने दाखविलेला हा अनोखा टप्पा होता. तर ‘निफ्टी’ही ५७.७० अंश वाढीसह ५,७८८.९५ पुढे वाटचाल करीत होता.
आयुर्विमा, निवृत्ती वेतन यामध्ये थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तबाच्या आशेने एकूणच बाजारात खरेदीचे वातावरण होते. सेन्सेक्सने दिवसभरात १९,१०७.०४ या उच्चांकापर्यंत तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’नेही ५,८०० पर्यंत मजल मारली. दिवसअखेर मात्र निफ्टी ५६.३५ अंश वाढीसह ५,७८७.६० वर स्थिरावला.
बाजारात विशेषत: बँक क्षेत्रातील समभागांची यावेळी खरेदी झाली. त्याचबरोबर बांधकाम, भांडवली वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील समभागांचेही मूल्य वधारले. वधारलेल्या प्रमुख २० समभागांमध्ये भेल, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज्, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांचा समावेश राहिला. त्यांच्यात २.१६ ते तब्बल ६.५७ टक्क्यांपर्यंतची मूल्य वाढ झाली होती.
सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदविताना ‘सेन्सेक्स’ १८८.४६ अंशांची मजल मारत दिवसअखेर १९,०५८.१५ वर पोहोचला. चार दिवसांच्या तेजीमुळे मुंबई निर्देशांकाने ४८० अंशांची घसघशीत भर घातली आहे. आजच्या मुंबई निर्देशांकाच्या एक टक्का वधारणेमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही ६६.७१ लाख रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.    
रुपया झेपावला ५१ पुढे..
अखेर तब्बल साडेपाच महिन्याच्या कालावधीनंतर स्थानिक चलन अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५१ वर झेपावले. रुपया गुरुवारी आणखी ४२ पैशांनी वधारत ५१.७४ पर्यंत गेला. १७ एप्रिल २०१२ नंतर प्रथमच रुपयाची ५१ वर उडी गेली आहे. गेल्या पाच सत्रातील त्याची भक्कमता तब्बल ३.३% मध्ये परावर्तित झाली आहे. गेल्या चार दिवसात तो एक रुपयाने भक्कम झाला आहे.
रिफॉम्र्स पुश..
विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा २६ % वरून ४९ %
आदित्य बिर्ला नुवो    ९४९.८०     (४.४१%)
बजाज फिनसव्‍‌र्ह    ४५२.८५     (१.९६%)
रिलायन्स कॅपिटल    ९५३.८५     (३.११%)
मॅक्स इंडिया     २३१,४५    (-०.७९%)
(दोन आठवडय़ात मॅक्स इंडियाने २०% वाढ दाखविली आहे)‘फॉरवर्ड मार्केट कमिशन’ला वाढीव अधिकार बहाल करणारे ‘एफसीआरए सुधारणा’ विधेयक
फायनान्शियल टेक.       १००२.९५                  (३.४१%)
एमसीएक्स इंडिया         १२९४.६५                  (४.०४%)

*१५ महिन्यांनंतर गाठला १९ हजारांचा पल्ला
*चार सत्रात सेन्सेक्सची ५०० अंश झेप
*‘निफ्टी’चाही ५,८०० ला स्पर्श
*गुंतवणूकदारांची माया ४८,००० कोटींनी वाढली

*शेअर उलाढाल कंपन्यांना वरचे सर्किट
दीर्घावधीच्या खंडानंतर बाजारात सुरू झालेल्या तेजीच्या प्रवाहाने ब्रोकिंग कंपन्यांनही वाढत्या उलाढालीचे वेध लागले असून, परिणामी अडगळीत गेलेल्या या कंपन्यांच्या समभागांना बाजारात अकस्मात मागणी वाढली. ‘आदित्य बिर्ला मनी’ला वरचे १० टक्क्यांचे वरचे सर्किट लागून बीएसईवर तो २२.१३ वर स्थिरावला. एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस ४०.८० रु. (१०.४२%) तर मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस १२२.९५ (५.८१%) असे अन्य समभागांनी रग्गड कमाई केली.

अत्यंत भांडवलप्रवण विमा क्षेत्रात विदेशातून अतिरिक्त गुंतवणुकीला वाव मिळाल्यास देशात अद्याप बाल्यावस्थेत असलेल्या विमा बाजारपेठेला वृद्धींगत करता येईल. विशेषत: नव्याने आलेले भांडवल विमा कंपन्यांना वितरण जाळ्यात विस्तारासाठी आणि आपल्या सेवा छोटी शहरे व ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी वापरता येईल.
निधी सारस्वत, बोनान्झा कॅपिटल

सरकारकडून अधिक आर्थिक सुधारणांची अपेक्षा आहे. आणि हेच स्थानिक बाजारातील कल अधिक वधारण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल. जागतिक बाजार सुमार कामगिरी करीत असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाने बजाविलेली कामगिरी उल्लेखनीय म्हणायला हवी. जवळपास साडेपाच महिन्यांनतर रुपया भक्कम झाला आहे.
अभिषेक गोएंका,
मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हाझर्स

विमा क्षेत्राला अधिक उभारी ठरणारा निर्णय या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढविण्याच्या रुपाने होत आहे. यामुळे भारतीय विमा उद्योगात अधिक निधी येईल. शिवाय विदेशी गुंतवणूकदारही आकर्षित होतील.
नागेश्वर राव,
मुख्य कार्यकारी अधिकारी, आयडीबीआय फेडरल लाईफ

मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण ठरविताना वाढती महागाई नजरेआड करून चालणार नाही. गेल्या काही दिवसात हा दर दुहेरी आकडय़ावरून कमी झाला आहे. एकूणच विकासाबरोबर महागाई लक्षात घेऊन ३० ऑक्टोबरचे पतधोरण असेल.
डी. सुब्बराव, ‘भारतीय रिझव्‍‌र्ह बँके’चे गव्हर्नर (गुरुवारी पाँडेचरी येथे)

सेन्सेक्स
१९०५८.१५
१८८.४६

निफ्टी
५७८७.६०
५६.३५

वधारले
भेल    ६.५७%
आयसीआय.बँक    २.९३%
डॉ. रेड्डीज्    २.१६%
भारतीय स्टेट बँक    २.१५%
मारुती सुझुकी    १.९७%

घसरले
सिप्ला    -३.८६%
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र    -१.२४%
बजाज ऑटो    -१.०५%
हीरो मोटोकॉर्प    -१.०२%
कोल इंडिया    -०.९२%