सोने मात्र वधारू लागले! Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
सलगच्या वधारणेनंतर नरम पडू लागलेल्या भांडवली बाजाराचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले असतानाच सराफा बाजारात पुन्हा चमक निर्माण झाली आहे. शहरात सोने धातूचे दर प्रती तोळी ९० रुपयांनी वधारले. परिणामी दोन्ही प्रकारचे सोन्याचे दर पुन्हा एकदा १० ग्रॅमसाठी ३१ हजारापुढे वाटचाल करते झाले. मुंबईत स्टॅण्डर्ड सोन्याचा दर ३१,०७० तर शुद्ध सोन्याचा भाव ३१,२१० पर्यंत धडकला. चांदीचे दरही शहरात किलोमागे ३० रुपयांनी वाढले. शुक्रवारी चांदीचा याच वजनासाठीचा भाव ६१,७६० रुपयांवर गेला.
गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंचे दर कमी झालेले दिसत होते. यामुळे सोने तर तोळ्यासाठी ३१ हजाराच्याही खाली गेले होते. सध्या पितृ पंधरवडा असल्याने तशीही खरेदीही मंदाविली आहे. त्यामुळे येत्या २० दिवसांवर येणाऱ्या दसऱ्याला खऱ्या सोन्याचा दर कमी असेल, या आशेबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.