अन्नधान्यांच्या किंमतींचा महागाईवर दबाव कायम Print

नवी दिल्ली
पीटीआय
अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींचा दबाव एकूण महागाई दरांवर कायम राहिला आहे. खाद्यतेल, साखर, भाज्या, डाळी यासारख्या वस्तूंच्या चढय़ा किंमतींनी सप्टेंबरमधील एकूण महागाई दराला दुहेरी आकडय़ासमीपच ठेवले आहे. ऑगस्टच्या १०.०३ टक्क्यांच्या तुलनेत गेल्या महिन्यातील हा दर ९.७३ टक्के असला तरी त्यात यंदा फार काही मोठी घसरण पहायला मिळालेली नाही.
सप्टेंबरमध्ये साखरेच्या किंमती सर्वाधिक १९.४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या कालावधीत खाद्यतेलेही १८.५४ टक्क्यांनी महाग झाली आहेत. तर डाळींचे दर १६.२ टक्क्यांनी कडाडल्या आहेत. भाज्याही या दरम्यान १४.३ टक्क्यांनी वधारल्या आहेत. मटण, मासे आणि अंडी यांच्या किंमतीही १२ टक्क्यांपर्यंत उंचावल्या आहेत.