‘टाटा-स्टारबक्स’जोडगोळीचे दक्षिण मुंबईत पहिले दालन अवतरले! Print

 

व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल येथील ऐतिहासिक एल्फिस्टन इमारतीत (तीदेखील टाटा समूहाच्या मालकीची) दोन मजल्यांमध्ये ‘स्टारबक्स कॉफी : ए टाटा अलायन्स’ या ब्रीदाअंतर्गत जगभरच्या कॉफी चाहत्यांची पसंती लाभलेल्या सिएटलस्थित ‘स्टारबक्स’ने भारतीय बाजारपेठेत शुक्रवारी पदार्पण केले. स्टारबक्सबरोबर भारतात भागीदारीने व्यवसाय करण्याची टाटा ग्लोबल बेव्हरेजेसने जानेवारी २०१२ मध्ये घोषणा केली होती, तिने आज प्रत्यक्षरूप धारण केले. देशातील आधुनिक कॉफी हाऊसमध्ये यातून आता तगडी स्पर्धा रंगणार आहे.

येत्या आठवडय़ात शहरात अशी आणखी दोन दालने (बुधवारी ओबेरॉय मॉल आणि गुरुवारी ताज महाल पॅलेस अॅन्ड टॉवरमध्ये) सुरू करण्यात येणार आहेत, अशी घोषणा स्टारबक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हॉवर्ड शुल्ट्झ यांनी केली.  स्पर्धक कॅफे कॉफी डेची देशभरात १,३५० दालने आहेत.    

‘लार्सन अॅण्ड टुब्रो’ समूहातील वित्त क्षेत्रातील कंपनीने यंदाच्या ताळेबंदात २७.२३% वार्षिक वाढ नोंदविली आहे. त्याचबरोबर तिमाहीतही १९.१०% वाढ राखली गेली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील करोत्तर नफा १४३.७३ कोटी रुपयांचा आहे.
वाय. एम. देवस्थळी,
‘एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्स’चे अध्यक्ष (शुक्रवारी मुंबईत)

सेन्सेक्स
१८६८२.३१
१०९.६२

निफ्टी
५६८४.२५
३४.४५

वधारले
आयटीसी    २.०९%
हीरो मोटोकॉर्प    ०.५४%
डॉ. रेड्डीज लेबो.    ०.४३%
भारती एअरटेल    ०.३४%
इन्फोसिस    ०.३२%

घसरले
हिंदाल्को    -२.५४%
जिंदाल स्टील    -२.५३%
गेल    -२.३१%
भेल    -२.०२%
टाटा पॉवर    -१.८२%