खाद्यतेलाच्या आयातीचा विक्रम! Print

उत्पादनापेक्षा मागणीच अधिक
कोटी मेट्रिक टनचा टप्पाही पार?

व्यापार प्रतिनिधी, मुंबई - मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
*  वर्षभरापूर्वीची खाद्यतेल आयात ७४.९० लाख मेट्रिक टन
*  ११ महिन्यांमध्ये आयात १९.६ टक्क्यांनी वधारली
*  भारताला गरज १.६५ कोटी मेट्रिक टनची
*  देशांतर्गत उत्पादन अवघ्या ७० लाख मेट्रिक टनचे
वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच खाद्यतेलाने इतिहासातील सर्वाधिक आयात नोंदविली आहे. उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याने भारताकडून वर्षभरात विविध खाद्यतेलांची मोठय़ा प्रमाणात देशाबाहेरून आयात नोंदली गेली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच खाद्यतेल आयातीचा एक कोटी मेट्रिक टनचा टप्पा गाठला जाणार आहे.


भारतीय खाद्यतेल क्षेत्रासाठी नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे विपणन वर्ष गृहित धरले जाते. खाद्यतेलासाठी घ्यावे लागणाऱ्या पिक मोसमानुसार हा कालावधी क्षेत्रासाठी ग्रा'ा धरला जातो. यानुसार चालू वर्ष संपण्यास ऑक्टोबर हा एकच महिना आता शिल्लक आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय खाद्यतेलाच्या आयातीने विक्रम रचला आहे.
नोव्हेंबर २०११ ते सप्टेंबर २०१२ दरम्यान खाद्यतेल आयात ८९.६० लाख मेट्रिक टन झाली आहे. ती आतापर्यंतच्या आयातीपेक्षा सर्वाधिक आहे. यापूर्वीच्या संपूर्ण वर्षांतही ती कमी, ७४.९० लाख मेट्रिक टन होती. यंदा पामोलिन, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल यांची अधिक प्रमाणात आयात झाल्याने एकूण खाद्यतेल आयातही विस्तारली गेली आहे. विपणन वर्षांतील पहिल्या ११ महिन्यातच खाद्यतेल आयात १९.६ टक्क्यांनी वधारली आहे. २०११-१२ या गेल्या आर्थिक वर्षांत खाद्यतेल आयात ५७ टक्क्यांनी वधारली होती. तर २००८-०९ मध्ये ती ४९ टक्क्यांनी वाढली होती.
चालू विपणन वर्षांत खाद्यतेल आयात १ कोटी मेट्रिक टननजीक असेल, अशी भीती ‘अनिल न्युट्रिएन्ट्स’च्या कृषी-वस्तू विभागाचे उपाध्यक्ष राजु चोक्सी यांनी व्यक्त केली. भारतीय खाद्यतेल क्षेत्रातील आघाडीची तेल उत्पादकांची संघटना असलेल्या ‘सॉलव्हन्ट एक्स्ट्रॅर्स असोसिएशन’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकभरात भारतामार्फत होणारी खाद्यतेल आयातीने सरासरी वार्षिक ५५ टक्के प्रमाण राखले आहे. संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांच्या म्हणण्यानुसार, भारतात वर्षांला १.६५ कोटी टन खाद्यतेलाची गरज भासते. पैकी ७० लाख टन खाद्यतेलाचे येथेच उत्पादन होते.    

देशातील सर्व जनतेला सर्वसाधारण विम्याचे छत्र मिळण्यासाठी उद्योग जगताने आपला आराखडा तयार ठेवण्याची गरज आहे. यासाटी सरकारचेही सहकार्य आहे. सध्या विम्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. ते ४ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज आहे.
पी. चिदंबरम,
केंद्रीय अर्थमंत्री (सोमवारी दिल्लीत)

सेन्सेक्स
१८७९३.४४
१११.१३

निफ्टी
५७१७.१५
३२.९०

वधारले
टीसीएस    २.२६%
एल अ‍ॅण्ट टी    २.१७%
भारती एअरटेल    १.९१%
एनटीपीसी    १.७४%
एचडीएफसी बँक    १.७३%

घसरले
जिंदाल स्टील    -१.५२%
आयटीसी    -१.२४%
स्टरलाईट इंड.    -१.१५%
हीरो मोटोकॉर्प    -१.०१%
टाटा मोटर्स    -०.८६%