कॉटनकिंगकडून ‘एरोसॉफ्ट’ शर्टची श्रेणी Print

प्रतिनिधी , पुणे
सुती कपडय़ांच्या क्षेत्रातील आघाडीचा बँड्र असणाऱ्या कॉटनकिंगने ‘एरोसॉफ्ट’ या शर्ट्सची नवीन श्रेणी नुकतीच सादर केली आहे.मोरपंखी स्पर्शाचा अनुभूती देणारा व आरामदायी ठरेल अशी फिटिंग यांचा अभूतपूर्व मिलाफ साधणाऱ्या ‘एरोसॉफ्ट’ शर्ट्सची श्रेणी ग्राहकांसाठी कॉटनकिंगच्या सर्व दालनात उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती कॉटनकिंगचे संचालक प्रदीप मराठे यांनी दिली.
दसरा-दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर ही नवीन श्रेणी सादर केली आहे. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेचा वापर न करता या शर्ट्सची निर्मिती करण्यात आली आहे. कॅज्युअल, फॉर्मल व सेमी फॉर्मल अशा तिन्ही प्रमुख प्रकारांमध्ये ते उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.