गोल्ड ईटीएफ ; सर्वोत्कृष्ट संपत्ती वर्गामध्ये गुंतवणुकीचा सोयीस्कर मार्ग Print

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

परंपरागतरित्या भारतीय नागरिकांसाठी सोने ही सर्वात जास्त पसंतीची संपत्ती आहे. विशेष करुन, सणांच्याप्रसंगी ते सोने खरेदी करणे सर्वात जास्त पसंत करतात. मग तो प्रकाशाचा सण असो किंवा दसरा असो किंवा धनत्रयोदशी किंवा दिवाळी असो. अशा प्रसंगी सोन्याची सर्वात जास्त खरेदी करण्यात येते. हा पिवळा धातू दशकांपासून सर्व संपत्ती वर्गाच्या तुलनेत सर्वात जास्त प्रदर्शन करीत आला आहे आणि चलनवाढीला सामोरे जाण्यामध्ये सहाय्यक सिद्ध होत आहे.
गुंतवणूकदार पूर्वी सोन्याच्या धातू स्वरुपामध्ये गुंतवणूक करणे पसंत करत होते. परंतू जेव्हापासून गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफविषयी जागरुकता पसरली आहे तेव्हापासून या संपत्ती वर्गाकडे अत्यंत जलदतेने गुंतवणूकदारांचे लक्ष आकर्षलेि जात आहे.
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वात सोपी पद्धती आहे. कारण, यामध्ये धातूच्या स्वरुपामध्ये सोने ठेवण्याची समस्या राहत नाही आणि हे शुद्धदेखील असते. सध्याची प्रवृत्ती पाहता असे माहित पडते की, अग्रगण्य १० शहरेच नव्हे तर टियर२ व टियर३ शहरांतील गुंतवणूकदारांनीदेखील ईटीएफच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.  
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) गुंतवणूकदारांमध्ये जागरुकता आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस् किंवा गोल्ड ईटीएफ कमी खर्चाच्या किंवा भौतिक स्वरुपात सोन्याच्या तुलनेत अधिक प्रभावी व आकर्षक आहेत.
कारण, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्याने करामध्ये लाभ मिळतो. उदा - व्हॅट, एसटीटी व सेल्स टॅक्स गोल्ड ईटीएफच्या खरेदीवर लागू होत नाही. एक्सचेंजच्या पारदर्शक मंचाद्वारे हे खरेदी करणे व विकणे सोपे असते. जेथे किंमत परतावा वास्तविक वेळेच्या दृष्टिकोनातून प्रभावी असतो.
गेल्या काही वर्षांमध्ये या उत्पादनांमध्ये गुंतवणूकदारांची निवड अत्यंत जलदतेने वाढत आहे. जस-जशी जागरुकता वाढत आहे, तस-तशी गोल्ड ईटीएफमध्ये व्यवहार करणाऱ्यांची संख्या जलदतेने वाढत आहे.
ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१२ दरम्यानच्या वर्षभराच्या कालावधीत एनएसईमधील गोल्ड ईटीएफमध्ये व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत ४१% वाढ झाली आहे. ऑगस्ट २०११ मध्ये अशा ग्राहकांची संख्या ५६,००० होती आणि ऑगस्ट २०१२ मध्ये वधारून ती ७९,००० पर्यंत पोहोचली आहे.
चालू आíथक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये सरासरी मासिक संपूर्ण कारभार १,१९५ कोटी रुपये राहिला. तर, गेल्या वर्षीच्या याच कालावधीमध्ये हा ९३३ कोटी रुपये होता. यात २८% वाढ नोंदविण्यात आली आहे.  
गेल्या वर्षभरात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना वार्षकि तत्त्वावर किमान ११% परतावा मिळाला आहे. गोल्ड ईटीएफ योजना चालविणाऱ्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांद्वारे साठविण्यात आलेले सोने मार्च २०११ मध्ये १९ टन होते आणि सप्टेंबर २०११ मध्ये वाढून २८ टनपर्यंत पोहोचले. जून २०१२ मध्ये ते वधारून ३३ टनपर्यंत पोहोचले. फक्त ९ महिन्यांमध्ये १७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
गोल्ड ईटीएफच्या अंतर्गत व्यवस्थापनातंर्गत संपत्ती सप्टेंबर २०१२ मध्ये ११,१९८ कोटी रुपये राहिली, तर गेल्या महिन्याच्या समान कालावधीमध्ये ही ८,१७३ कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये ३७% वाढ नोंदविण्यात आली आहे. सध्या एनएसईमध्ये १४ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यामार्फत हे उत्पादन सादर करत आहेत.
गोल्ड ईटीएफचे सरासरी डिलिव्हरी मूल्य एक्सचेंजमध्ये सप्टेंबर २०११ पासून ऑगस्ट २०१२ दरम्यान आधीच्या वर्षांच्या तुलनेत १७% वाढून ४३३ कोटी रुपयांच्या स्तरावर पोहोचले. खुद्द एनएसईच्या ग्राहकवर्गांमध्येही गोल्ड ईटीएफमुळे ४१% वाढ झाली आहे. शिवाय मासिक सरासरी व्यवहारही २८% वधारणा झाली आहे.
गोल्ड ईटीएफमध्ये रिटेल गुंतवणूकदारांकरिता गुंतवणूक करणे शक्य आहे. ते एक ग्रॅममध्येदेखील गुंतवणूक करु शकतात. एक किलोग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त सोन्याची डिलिव्हरी घेणेही येथे शक्य आहे.
खरे तर, काही अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी भौतिक स्वरुपात कमीत कमी १० ग्रॅम सोने देणे सुरु केले आहे. बऱ्याच अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या आपल्या ग्राहकांना एसआयपीदेखील (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन) सादर करत आहेत. यामुळे, गुंतवणूकदारांनाच लाभ होत आहे, त्यांनी एकदाच थोडय़ा रक्कमेची गुंतवणूक करावी लागते.
या महिन्यापासून मागणी वाढण्याची आशा, कारण वैवाहिक हंगामासह दसरा, धनत्रयोदशी व दिवाळी यांसारखे सण आहेत.  लग्नांचा हंगाम व धनत्रयोदशी, दसरा - दिवाळी यांसारख्या सणांमध्ये सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होते.
यावर्षी अक्षयतृतियेच्या निमित्ताने एक्सचेंजने गोल्ड ईटीएफमध्ये ६०८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. ते गेल्या वर्षीच्या अक्षयतृतियेला झालेल्या व्यवहारांच्या तुलनेत ४४%अधिक होते. २०११मधील अक्षयतृतियेला एनएसईमध्ये ४२३.०५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.
अशाच प्रकारे गेल्या वर्षी धनत्रयोदशीला एक्सचेंजच्या व्यासपीठावर गोल्ड ईटीएफमध्ये ६३६.०४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. एका दिवसामध्ये २४.६१ लाख यूनिटमध्ये व्यवहार झाले, जे कोणत्याही दिवसाच्या व्यवसायामध्ये आतापर्यंतचे सर्वात जास्त होते.    

*यंदाच्या अक्षयतृतियेला एनएसईवर गोल्ड ईटीएफमध्ये ६०८ कोटी रुपयांचे व्यवहार
*गेल्या वर्षी धनत्रयोदशीला एक्सचेंजच्या व्यासपीठावर ६३६ कोटी रुपयांचे एक दिवसातील सर्वाधिक व्यवहार
*वर्षभरात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना किमान ११% परतावा
*वर्षांनुवष्रे व्यवस्थापनातंर्गत संपत्तीमध्ये ३७% टक्क्यांची वाढ
*सप्टेंबर २०१२ मध्ये ११ हजार कोटी रुपयांची संपत्ती
*अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांद्वारे साठविण्यात आलेले सोने सप्टेंबर २०११ मध्ये २८ टनपर्यंत
*एनएसईच्या व्यासपीठावर गोल्ड ईटीएफ व्यवहारात वर्षभरात ४१% वाढ
*ऑगस्ट २०१२ पर्यंत ग्राहकसंख्या ७९ हजारापर्यंत
*पहिल्या सात महिन्यांमध्ये १,२०० कोटींचा कारभार