ऑटोशोमध्ये रंगणार थरार ‘४एक्स४’चा Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
alt

ऑटोकार या नियतकालिकातर्फे नित्यनेमाने भरणारा ऑटोकार परफॉर्मन्स शो यंदाही मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर पहायला मिळणार आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण खास ४एक्स४ वाहन प्रकाराच्या दालनांचे आहे. या सुपरकार गॅलरीत भक्कम आणि कुठल्याही रस्त्यांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या वाहनांची रेलचेल असेल. यंदा या प्रदर्शना दरम्यान आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्यांबरोबर स्थानिक कंपन्याही सहभाग घेणार आहेत.
१ ते ४ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान हे प्रदर्शन आहे. प्रवेशासाठी प्रत्येकी १५० रुपये शुल्क आहे.